जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

कांद्याचा वांदा,शेतकरी संघटना संतप्त !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   राज्यातील कांदा उत्पादक यांच्या कष्टाची माती होताना दिसून येत असून एक रुपये किलोने कांदा खरेदी करताना कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि व्यापारी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून शेतकरी संतप्त झाला आहे.परिणामी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीला धाव घेत जाब विचारला असून कांदा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या दरानेच खरेदी करावा अशी मागणी केली आहे.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला केवळ एक रुपया किलोचा दर काढल्याने शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीला धाव घेत जाब विचारला तो क्षण.

 

“श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला विगतवारी करणारे  (ग्रेडर) यंत्र आहे का ? लिलावाची बोली कुठपासून पासून सुरू झाली ? किती व्यापाऱ्यांना परवाने वाटलेले आहे ? प्रत्यक्षात आज रोजी किती व्यापारी लिलावासाठी उपस्थित आहे ? जे व्यापारी अनुपस्थित आहे त्यांचे परवाने रद्द करावे.अडत्याने केवळ बोली बोलणे अपेक्षित असून बोली बोलणारा इसम हा बाजार समितीचा अधिकृत कर्मचारी असावा.हमाली-तोलाई ही शेतकऱ्याकडून कोणत्या नियमानुसार कपात केली जाते ? हमाली तोलाई बाबत पणन विभागाचे 02 मे 2025 चे पत्रक असून तो कायदा नाही आडत-हमाली,तोलाई आदी शेतकऱ्यांच्या बिलातून कपात करू नये सदर परिपत्रकात त्याचे केवळ दर दिले आहे.वसुलीचे आदेश दिले नाही.बाजार समिती बेकायदेशीर रित्या नियम धाब्यावर ठेवून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे”- ॲड.अजित काळे,प्रदेश उपाध्यक्ष,शेतकरी संघटना.

   महाराष्ट्रात कांद्याचे दर अक्षरशः कोसळल्याने उत्पादक शेतकरी प्रचंड संतापले आहेत.उत्पादन खर्च प्रतिकिलो १७ ते २० रुपये असताना बाजारात कांद्याला केवळ ६ ते १२.५० रुपये प्रतिकिलो किंवा त्याहूनही कमी भाव मिळत आहे.यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेनासा झाला असून राज्यभरात तीव्र आंदोलने सुरू आहे.कोपरगाव,राहाता, लासलगाव,येवला आणि नाशिकसह अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रति क्विंटल ६०० ते १,२०० रुपये प्रति किलो असा अत्यल्प दर मिळत आहे.काही ठिकाणी तर दलाली आणि वाहतूक खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात कवडीही पडत नसल्याचे धक्कादायक प्रकार घडले आहे.सरकारने कांदा थेट बाजार समित्यांमधून किमान २,४०० ते २,५०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करावा,अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.

संग्रहित छायाचित्र.

  “मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा दर्जेदार कांदा हा 12 रुपये 35 पैसे कमाल तर 05 किमान दराने खरेदी केला जाईल असे आश्वासन दिलेले आहे.आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांचा कमी दराने कांदा खरेदी केला आहे त्याचा फरक हा शेतकऱ्यांना परत करण्यात यावा.तसे बाजार समितीचे पत्रक काढावे,मोकळ्या कांद्याची खरेदी सुरू करावी त्याला ‘नाफेड’चे नियम लागू करावे आदी मागण्या केल्या आहेत.शेतकऱ्यांच्या मागण्या या मान्य न झाल्यास बाजार समितीची कांदा खरेदी बंद करण्यात येणार आहे”-ॲड.अजित काळे,शेतकरी संघटना.

   दरम्यान केंद्र सरकारने १२.३५ प्रति किलोने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या दरापेक्षा कमी दराने कांदा खरेदी करू नये असे जाहीर केले आहे.मात्र हा दर उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी असल्याने शेतकरी आणि विरोधी पक्षांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.याबाबत श्रीरामपूर येथेही असाच कांद्याचा वांदा निर्माण झाला आहे.श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने जनाची नाही तर मनाची सोडून कांद्याचा लिलाव चक्क 01 रुपये दराने केल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली असल्याचे आज बघायला मिळाले आहे.हताश झालेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांच्याशी संपर्क केला होता.ते आपल्या सहकाऱ्यांवर समवेत श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हजर झाले.त्यावेळी बाजार समितीचे सचिव श्री.वाबळे यांना लिलाव स्थळी नेण्यात आले.त्यावेळी ॲड.अजित काळे हे प्रचंड आक्रमक झाले असल्याचे दिसून आले आहे.त्यांनी बाजार समितीचे सचिव व आडते यांना चांगलेच धारेवर धरले.त्यावेळी त्यांनी बाजार समितीला विगतवारी करणारे  (ग्रेडर) यंत्र आहे का ? असा जाबसाल केला आहे.लिलावाची बोली कुठपासून पासून सुरू झाली ? किती व्यापाऱ्यांना परवाने वाटलेले आहे ? प्रत्यक्षात आज रोजी किती व्यापारी लिलावासाठी उपस्थित आहे ? जे व्यापारी अनुपस्थित आहे त्यांचे परवाने रद्द करावे अशी मागणी करून प्रत्यक्षात बाजार समितीचा कर्मचारी लिलाव स्थळी उपलब्ध आहे का ? अडत्याने केवळ बोली बोलणे अपेक्षित असून बोली बोलणारा इसम हा बाजार समितीचा अधिकृत कर्मचारी असावा अशी मागणी केली आहे.हमाली-तोलाई ही शेतकऱ्याकडून कोणत्या नियमानुसार कपात केली जाते ? आदी प्रश्न विचारून यांनी प्रशासनास चांगलेच फटकारले असल्याचे दिसून आले आहे.याबाबत त्यांनी 02 मे 2025 चे पत्रक दाखवले व कपात करता येते असे प्रशासनाचे वतीने सांगण्यात आले असल्याचा खुलासा केला असता त्यावर ॲड.काळे यांनी आक्षेप घेतला आहे.हे केवळ परिपत्रक असून कायदा नाही आडत-हमाली,तोलाई आदी शेतकऱ्यांच्या बिलातून कपात करू नये सदर परिपत्रकात त्याचे केवळ दर दिले आहे.वसुलीचे आदेश दिले नाही असा खुलासा केला आहे.बाजार समिती बेकायदेशीर रित्या नियम धाब्यावर ठेवून शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप केला आहे.त्यावर श्री.वाबळे यांनी  हमाली तोलाई शेतकऱ्यांच्या बिलातून कपात केली जाणार नाही आपण तसे पत्रक काढू असे आश्वासन दिले आहे.त्यावेळी मागील वसूल केलेली हमाली,तोलाई परत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

   दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा दर्जेदार कांदा हा 12 रुपये 35 पैसे कमाल तर 05 किमान दराने खरेदी केला जाईल असे आश्वासन दिलेले आहे.आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांचा कमी दराने कांदा खरेदी केला आहे त्याचा फरक हा शेतकऱ्यांना परत करण्यात यावा.तसे बाजार समितीचे पत्रक काढावे,मोकळ्या कांद्याची खरेदी सुरू करावी त्याला ‘नाफेड’चे नियम लागू करावे आदी मागण्या केल्या आहेत.शेतकऱ्यांच्या मागण्या या मान्य न झाल्यास बाजार समितीची कांदा खरेदी बंद करण्यात येईल असा इशारा ॲड.काळे यांनी शेवटी दिला आहे.

  सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शरद आसणे,शेतकरी संघटनेचे संपर्कप्रमुख साहेबराव चोरमल,सचिन वेताळ,बापूसाहेब गोरे,सुजित बोडखे,ज्ञानदेव चक्रनारायण,संतोष मुठे,राहुल निघोट,शिवाजी पठारे,भाऊसाहेब गव्हाणे,ॲड.प्रशांत कापसे,ॲड.सर्जेराव घोडे,कैलास भणगे,प्रशांत शिंदे,आकाश मोठे,रणजीत पठारे,डॉ. आदिक,डॉ.विकास नवले,सागर गिरे,सतीश नाईक,सोपान नाईक,संदीप उघडे,पांडूरंग मगर,इंद्रभान चोरमल,अकबर शेख आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थिती होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close