जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या नगरपरिषदेत क्विक रिस्पॉन्स फायर अँड रेस्क्यू वाहन !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला बळकटी देण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या ताफ्यात अत्याधुनिक क्विक रिस्पॉन्स फायर अँड रेस्क्यू व्हेईकल दाखल करण्यात आले असल्याचे माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली आहे.

कोपरगाव नगरपरिषदेच्या ताफ्यात अत्याधुनिक क्विक रिस्पॉन्स फायर अँड रेस्क्यू व्हेईकल दाखल करण्यात आले तो क्षण.

   क्विक रिस्पॉन्स फायर अँड रेस्क्यू वाहन हे आणीबाणीच्या प्रसंगी जलद मदत पोहोचवण्यासाठी डिझाइन केलेले छोटे,चपळ आणि बहुउद्देशीय वाहन मानले जाते.हे प्रामुख्याने तंग आणि दाट वस्तीच्या भागात,जेथे मोठ्या दमकल गाड्या पोहोचू शकत नाहीत,तिथे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि बचाव कार्यासाठी वापरले जाते.या वाहनांची प्रमुख उपयोगिता तंग गल्ल्यांमध्ये सुलभ प्रवेश करणे सोपे जाते शिवाय हे वाहन लहान आकारमानाचे असल्याने अरुंद रस्ते,दाट वस्त्या आणि अनधिकृत बांधकामांच्या भागात सहज जाऊ शकते.यामध्ये सहसा उच्च दाबाची वॉटर मिस्ट सिस्टीम.फोम आणि अग्निरोधक उपकरणे बसवलेली असतात,ज्यामुळे कमी पाण्यात जास्त आग आटोक्यात आणता येते. हे वाहन आगीच्या किंवा अपघाताच्या ठिकाणी मोठ्या दमकल गाड्यांपेक्षा वेगाने पोहोचून ‘प्राथमिक बचाव कार्य’करते,ज्यामुळे जीवित व वित्तहानी टाळता येते त्यामुळे अलीकडील याचे महत्व जास्त वाढले आहे.त्यामुळे राज्य सरकारच्या  नगरविकास विभागाने या मोठ्या नगरपरिषदांना ही वाहने पुरवली आहे.या पार्श्वभूमिवर याला महत्व आले आहे.मात्र या वाहनाची किंमत उपलब्ध होऊ शकली नाही.

     सदर प्रसंगी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत,आरोग्य सभापती वैभव आढाव,विद्या सोनवणे,आकाश वाजे,प्रशांत कडू,संतोष शिंदे,अतुल काले,संजय उदावंत,विक्रमादित्य सातभाई,विनोद राक्षे,स्वप्निल मंजुळ,कैलास मंजुळ,दत्तू पगारे,विजया देवकर,संदीप देवकर,फिरोज पठाण,सोनल अजमेरे,राजेंद्र सोनवणे,बबलू वाणी, नसीर मेंबर,गोपीनाथ गायकवाड,संतोष शेजवळ,सलीम पठाण,मयूर गायकवाड,रोहित वाघ,निसार शेख,बापू पवार,संतोष आढाव,यांच्यासह,नगर परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close