दळणवळण
तळेगाव मार्गे संगमनेर रस्त्याची कोपरगाव तालुक्यात लागली वाट !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
उत्तर भारतीय नागरिकांना सर्वात जवळचा ठरणारा तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्त्याची वर्षभरात चाळण होऊनही त्याकडे पाहण्यास सार्वजनिक बांधकाम विभागास आणि लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याने त्याची किंमत अवजड वहाने आणि प्रवाशांना चुकवावी लागत आहे परिणामी मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने या रस्त्याला कोणी वाली उरला आहे का ? असा सवाल जवळके,रांजणगाव देशमुख,धोंडेवाडी,वेस-सोयगाव,बहादरपुर,बहादराबाद,शहापूर,वेस-सोयगाव आदी ठिकाणच्या ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधीस विचारला आहे.

तळेगाव दिघे मार्गे संगमनेर हा रस्ता पोहेगाव शिवारात माजी आ.स्व.रोहमारे वस्ती जवळ,बहादराबाद शिवार,अंजनापुर शिवार,जवळके आदी ठिकाणी याची वाट लागली असल्याने या रस्त्यावरून वाहने चालवणे ही मोठी कसरत ठरत आहे.विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पार पडल्या असल्याने लोकप्रतिनिधींना या रस्त्याची आता गरज राहिलेली नाही.त्यामुळे ते त्याबाबत विचार करू शकत नाही.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या रस्त्यांची वाट लागली आहे.त्या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचं आहे.मात्र म्हणावा असा निधी मिळत नाही व तालुक्यातील रस्ते मात्र सुरळीत होत नाही हि तालुक्याची शोकांतिका आहे.नजीकच्या तालुक्यातील रस्ते मात्र चकाकताना दिसत आहे.त्यात मराठवाड्यातील तुलनेने मागास असलेल्या वैजापूर,गंगापूर,तालुका आणि येवला तालुका वरचढ ठरताना दिसत आहे.शेजारी संगमनेर,सिन्नर,निफाड तालुक्यातील कोणतेही रस्ते नादुरुस्त असल्याचे दिसत नाही.मात्र राजकारणात पुढारलेल्या अ.नगर जिल्ह्यातील प्रवेश केला की वाहतूकदारांना नगर जिल्ह्यात आल्याची चाहूल लागते ती मोठमोठ्या खड्डयांनी.त्यामुळे स्वाभाविक पणे त्यांच्या तोंडी शेलकी विशेषणे न आली तर नवल !तळेगाव दिघे मार्गे जाणाऱ्या झगडे फाटा ते वडगाव पान या रस्त्याची दुरावस्था तर विचारायला नको.या रस्त्याचे काम मागील उन्हाळ्यात कोल्हार येथील जगताप आणि कंपनीने घेतले होते.त्या कामाला एक महिना उलटत नाही तोच या रस्त्याची आगामी महिन्यात पावसाळा आहे याची चाहूल लागताच सदर रस्ता नादुरुस्त झाला होता.या रस्त्याची तब्बल तीन वर्षे ठेकेदार कंपनीकडे हमी असताना एक महिन्यात वाट लागलीच कशी याच्या सुरस कहाण्या ऐकावयास येत असून यात संबधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आपला टक्का घेत असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे कामाचा दर्जा टिकणार तरी कसा ? असा नागरिकांचा सवाल आहे.याबाबत सन-२०१९ साली केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नगर जिल्ह्यातील सरकारी कामाचा टक्का घेणाऱ्या सहकारी साखर उद्योगातील नेत्याचा निवडणूक काळात जाहीर समाचार घेतला होता.त्याची चर्चा राज्यभर झाली होती.मात्र पाच वर्षे उलटूनही या कामाच्या दर्जात कवडीचा फरक पडलेला नाही.कोपरगाव शहरातील बस स्थानक याचा जिताजागता पुरावा आहे.याबाबत मागील वर्षी ऍड.योगेश खालकर यांनी पडलेल्या खड्ड्यात थेट चुली भाजून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले होते.त्यानंतरही या कामाची साधी व पुरती डागडुजी झालेली नाही हे विशेष ! हा रस्ता पोहेगाव शिवारात माजी आ.स्व.रोहमारे वस्ती जवळ,बहादराबाद शिवार,अंजणापुर शिवार,जवळके आदी ठिकाणी याची वाट लागली असल्याने या रस्त्यावरून वाहने चालवणे ही मोठी कसरत ठरत आहे.विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पार पडल्या असल्याने लोकप्रतिनिधींना या रस्त्याची आता गरज राहिलेली नाही.त्यामुळे ते त्याबाबत विचार करू शकत नाही.आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आल्यावर याची डागडुजी होऊ शकते.मतदार संघातील नागरिकांना एरव्ही केवळ पोकळ बातम्या वाचाव्या लागतील.
याबाबत शिर्डी लोकसभा मतदार संघातील नव्याने निवडून आलेले खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोकसभेत पहिल्यांदा पोहचल्यावर या रस्त्याबाबत जवळके येथील जनमंगल ग्रामविकास संस्थेच्या मागणीवरून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन निधीसाठी मागणी केली होती.त्याबाबत त्यांनी सकारात्मक दुजोरा दिला होता.मात्र त्याला अद्याप मुहूर्त लाभलेला नाही.त्यामुळे नवीन रस्त्याबाबत अद्याप सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत आहे.मात्र याची किंमत प्रवासी आणि अवजड वाहनमालक यांना चुकवावी लागत आहे.या मार्गावरून शिर्डीची अवजड वाहतूक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने वारंवार वळवली जाते.त्यांनाही या मार्गाकडे पाहण्यास वेळ नाही.ज्या शिर्डी येथील साईबाबा संस्थांनसाठी ती वळवली जाते त्यांना याचे काही देणेघेणे नाही.केवळ गर्दीच्या हंगामात वहातून वळवून नियोजन केले जाते.त्याची किंमत मात्र या भागातील ग्रामस्थांना व वाहन चालकांना चुकवावी लागत आहे.पावसाळा केवळ एक महिन्यावर येवून ठेपला आहे.तरीही वर्षभरात हे खड्डे संबधित जगताप हे ठेकेदार भरू शकले नाही व अधिकारी हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन बघ्याची भूमिका घेत आहे.लोकप्रतिनिधीची तीच भूमिका आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने सार्वजनिक बांधकाम कोपरगाव उपविभागाचे अधिकारी वर्षेराज शिंदे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या ठेकेदार कंपनीचे अद्याप ०३ कोटींचे बिल थांबवून ठेवले असल्याचे सांगितले आहे.मात्र रक्कम थांबवून नागरिकांचे होणारे नुकसान भरून निघणार आहे का ? असा सवाल जवळके,रांजणगाव देशमुख,धोंडेवाडी,अंजनापुर,बहादरपूर,बहादराबाद,शहापूर,वेस-सोयगाव,पोहेगाव,चांदेकसारे आदी भागातील नागरिकांनी केला आहे.
रस्ता परत टोल नाके वाल्यांना द्यावा