गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात अपे रिक्षास उडवले,सात जण जागीच ठार तर सहा जखमी
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील डाऊच खु.ग्रामपंचायत हद्दीत कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर साईबाबा मंदिराच्या पूर्वेस साधारण दोनशे मीटर अंतरावर आज सकाळी ०७.४५ वाजेच्या सुमारास कोपरगाव कडे विद्यार्थ्यांना घेऊन कोपरगावच्या दिशेने येणाऱ्या अपे रिक्षास समोरून संगमनेरच्या दिशेने जाणाऱ्या परप्रांतीय ट्रकने दुचाकीस्वारास वाचविण्याच्या नादात ही धडक दिली आहे.या जोरदार धडकेत किमान सात जण ठार झाले आहे.त्यात तीन महिलां,दोन मुली व दोन ग्रामस्थ यांचा समावेश आहे. ट्रक चालक घटनास्थळावरून फरार होत असताना त्यास नागरिकांनी झगडे फाट्यानजीक अडवून ठेवल्याची माहिती प्राप्त झाली आहे.हा अपघात या वर्षी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठा अपघात मानला जात आहे.
घटनास्थळी अपघातग्रस्त रिक्षाचे छायाचित्र
कोपरगाव कडे विद्यार्थ्यांना घेऊन कोपरगावच्या दिशेने येणाऱ्या अपे रिक्षास समोरून संगमनेरच्या दिशेने जाणाऱ्या परप्रांतीय ट्रकने दुचाकीस्वारास वाचविम्याच्या नादात ही धडक दिली आहे.या जोरदार धडकेत किमान सहा जण ठार झाले आहे.
सदर कंटेनर हा पंजाब राज्यातील असून त्याचा क्रं. (पी.बी.०५ ए. बी.४००६) असा आहे.तो रायपूर कडून औरंगाबाद मार्गे मुंबईकडे जात होता.त्यात लोखंडी सळया भरलेल्या होत्या.चालकाचे नाव दर्शनसिंग गजनसिंग (वय-४१)असे असल्याचे सांगितले आहे.त्याला कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जखमीअनुक्रमे सर्वेश चौधरी,विलास खरात,कावेरी खरात,कृष्णाबाई चौधरी आदी दिसत आहे.
तर या घटनेतील अपघात रिक्षाचा क्रमांक एम.एच.१७ ए.जी.९०५६ असा असून तो चांदेकसारे येथील विलास साहेबराव खरात यांच्या मालकीची असल्याचे समजते.
दरम्यान जखमीमध्ये रिक्षातील चार जण तर दुचाकीवरील तीन जण असल्याचेसमजते.अपघातग्रस्त होंडा शाईन या दुचाकींचा क्रमांक (एम.एच.१७,सी.डी.२०८३) असा असल्याचे समजले आहे.
याच कंटेनरने आपे रिक्षास उडवले त्याचे छायाचित्र
दरम्यान या रिक्षात एकूण चालकासह बारा प्रवासी प्रवास करत होते.त्यात सात जण जागीच ठार झाले आहे तर सहा जण गंभीररीत्या जखमी झाले आहे.त्यातील मयतांची नावे खालील प्रमाणे राजाबाई साहेबराव खरात (वय-६०) रा.चांदेकसारे,आत्माराम जम्मानसा नाकोडे (वय-६५),पूजा नानासाहेब गायकवाड (वय-२०),हिंगणवेढे,प्रगती मधुकर होन वय-२०) रा.चांदेकसारे,शैला शिवाजी खरात (वय-४२) शिवाजी मारुती खरात वय-५२) दोन्ही रा.श्रीरामपुर आदी घटनास्थळीच ठार झाले आहे तर रुपाली सागर राठोड (वय-४०) रा.सिन्नर या महिलेवर उपचार सुरू असताना दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे.
अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी केलेली गर्दी.
दरम्यान जखमीं श्री संत जनार्दन स्वामी रुग्णालयात दाखल केले असून नावे पुढील प्रमाणे-राठोड ध्रुव सागर (वय-१५),चौधरी कृष्णाबाई गोविंद,(वय-४२) ,चौधरी सर्वेश दिगंबर (वय-१२),रा.पोहेगाव,खरात कावेरी विलास (वय-०५) रा.झगडे फाटा,ता कोपरगाव. विलास साहेबराव खरात (वय-३०) रा.झगडे फाटा आदींचा समावेश असल्याची माहिती संत जनार्दन स्वामी रुग्णालयाकडून प्राप्त झाली आहे.
घटनास्थळी श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी भेट दिली त्यावेळी घटनास्थळ दाखवताना पोलीस निरीक्षक वासुदेव देसले दिसत आहे.
जखमींना नजीकच्या संत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारार्थ रवाना केले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान घटनास्थळी श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी भेट दिली त्यावेळी त्यांना घटनास्थळ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दाखवले आहे.
दरम्यान घटनेवर शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव,कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांचे सहकारी हे घटनेवर लक्ष ठेऊन आहेत.