जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

कोपरगाव तालुक्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार ! तालुक्यात खळबळ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील वेळापूर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी मात्र कोळपेवाडी येथे शिक्षण घेणाऱ्या नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीस शाळा सुटल्यावर एका अज्ञात आरोपीने आपल्या दुचाकी गाडीवर बसवून नेऊन शहाजापूर शिवारातील एका निर्जन खोलीवर नेऊन बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या घटनेने कोपरगाव तालुका हादरून गेला आहे.कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी काल रात्रीच अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून त्या नंतर आता आपदग्रस्त मुलीची वैद्यकीय तपासणी करून पाथर्डी तालुक्यातील मात्र उसतोडी निमित्त या परिसरात कार्यरत असलेल्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा हालचाली सुरु केल्या आहेत.

आज सकाळपासून घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल मदने, दीपाली काळे,सागर पाटील या तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असून या घटनेबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.वैद्यकीय तपासणीत मुलीवर अत्याचार झाल्याचे मात्र उघड झाले आहे.त्या बाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी या घटनेबाबत मुलीचे अपहरण झाल्याची कबुली दिली असून काही तपासण्या झाल्याचे व काही बाकी असल्याचे सांगून वेळकाढूपणा केल्याचे दिसत आहे नगर येथून अहवाल आल्यावर पुढील कारवाई होईल असे म्हटले असून आरोपीच्या शोधार्थ तीन पथके रवाना केल्याचे सांगितले आहे. मात्र निरीक्षक अनिल कटके यांनी प्रथमदर्शनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयासमोर या घटनेनंतर झालेली गर्दी दिसत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि.वेळापूर ग्रामपंचायत हद्दीत एक दलित कुटुंबातील अल्पवयीन मुलगी आपल्या आपले आई-वडील,आजी-आजोबा,एक लहान भाऊ यांच्या समवेत रहात असून ती कोळपेवाडी येथील सहकारी साखर कारखान्यानजीक असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या एका विद्यालयात माध्यमिक विद्यालयाच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत आहे.ती नेहमी प्रमाणे काल सकाळी शाळेत गेली होती.शाळा काल सायंकाळी सुटल्यावर ती घराकडे परतलीच नाही.त्यामुळे घरची मंडळी अस्वस्थ झाली होती. त्यांनी आधी आजूबाजूला असलेल्या तिच्या मैत्रिणी व नंतर नातेवाईक यांचेकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही.या बाबत सामाजिक संकेत स्थळावर त्या बाबत हरवल्याची फोटोंसह द्वाही फिरविण्यात आली होती.

आरोपीने शहाजापूर ग्रामपंचायतीच्या उत्तरेस सुमारे सहाशे फूट असलेल्या एका निर्जन वस्तीवर जेथे पूर्वी या आरोपीस शेतमालकाने आश्रय दिला होता त्याच जागेवरील व त्याच मालकाची दुचाकी उसाचे वाढे आणण्याच्या बहाण्याने ताब्यात घेऊन व खोलीचे कुलूप तोडून रात्रभर हे दुष्कृत्य केले असल्याचे बोलले जात आहे.मात्र या अपहृत मुलीचा अक्रांत कोणालाच कसा ऐकू आला नाही ? कि आरोपीने तिला काही रासायनिक वायूंचा वापर करून तिला बेशुद्ध केले होते ? या बाबत अद्याप पोलिसही अनभिज्ञ आहेत.आरोपीने घटनास्थळावरून मुलीला सकाळी सोडून दिल्यावर तो फरार झाला आहे.पोलीस त्याचा शोध घेत असून त्याला शोधल्यावरच खरी बाब उघड होणार आहे.

या घटनेने बिहार,व उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील बलात्काराच्या घटनांनी आधीच देशातील वातावरण तापलेले असताना हि घटना घडल्याने पोलिसही हादरून गेले होते त्यांनी रात्रीच या घटनेबाबत दखल घेऊन अज्ञात आरोपी विरुद्ध या मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता.मात्र सदरची मुलगी सकाळी शिर्डी-लासलगाव रस्त्यावरील कोळपेवाडी कारखान्याकडे वळणाऱ्या फाट्यावर कारखाना कमानीजवळ आरोपीने सोडून दिल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन या मुलीची नगर येथील वैद्यकीय पथक बोलावून तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वेळापूर व कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.कोपरगाव तालुका पोलिसांनी या बाबत तपासणी करत असता काही ठिकाणचे फुटेज तपासले त्यावेळी हि मुलगी एका पाथर्डी भागातील मात्र या भागात उसतोडणीसाठी आलेल्या एका साधारण एकवीस वर्षीय मुलाबरोबर जाताना आढळून आल्याने पोलिसही चक्रावुन गेले.त्यांनी अधिकची तपासणी केली असता तो आरोपी पूर्वी सुरेगाव भागात रहात होता.व ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी त्याचा अधिवास होता.मात्र या मुलीचा व त्याचा संबंध नेमका कसा आला ? व त्याची व तिची ओळख कधी झाली ? या बाबत या मुलीकडून अद्याप खात्रीलायक बातमी मिळाली नाही.मुलगी अल्पवयीन असल्याने तपासासाठी पोलिसांना अडचणी येत आहे.त्यामुळे या घटनेचा गुंता अधिक वाढला आहे.

दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसांनी या अपहरण गुन्ह्या प्रकरणी अधिकच्या कलमांचा समावेश केला असून त्यात भा.द.वि.कलम ३७६,(२) (के.)(एल.)(एन.)३६३,३६६,३६६ (ए )३४२,३२६,बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ६,अ.जा.ज.अ. प्र.का.कलम ३(१),(डब्ल्यू),३(२),(५),३,(२),(५-ए) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले आहे.या बाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट कोपरगाव व जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय कोपरगाव यांना तसेच वरिष्ठांना सविस्तर अहवाल पोलिसांनी दाखल केला आहे.व पोलिस प्रशासन योग्य ती दखल घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close