जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

तीनदा बंधारा फुटला,शेतकऱ्याचे मोठे नुकसान,वाली नाही !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायत हद्दीत पश्चिमेस असलेल्या काळधोंडी नदीवर बांधलेला मात्र 10 वर्षात तीनदा फुटून शेतकऱ्यांचे सुमारे 38 आर क्षेत्राचे 15 लाख रुपयांचे नुकसान करणाऱ्या बंधाऱ्याचा पंचनामा होऊनही शेतकऱ्यास अद्याप कवडीची नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी संतप्त झाला असून त्यांनी तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.नुकसान भरपाई न मिळाल्यास आपण आंदोलन करू असा इशारा जीवन नाईक व अनिता नाईक यांनी दिला आहे.त्यामुळे लघु पाट बंधारेसह महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

रवंदे येथील काळधोंडी नदीवरील निकृष्ट बंधारा फुटून वाहून गेलेली शेतजमीन.

सन-२०१४-२०१५ स्राली ४० लाख रुपये खर्चुन रंवंदे गावातील काळधोंडी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधा-याचे काम निकृष्ट प्रतिचे झाल्याने गट नं.४८० क्षेत्रात त्याची मोठी किंमत चुकवावी लागली आहे.या बंधाऱ्याचे बाजुने भरावा न टाकल्याने व त्या बांधकामाला तडे गेल्याने तेथील भराव पूरपाण्याने बाहुन गेला.त्यात जीवन नाईक आणि अनिता नाईक यांचे शेताचे सन-2016-17 सालापासून तब्बल तीनदा मोठे नुकसान झाले आहे.

   पावसाळ्यात अनधिकृतपणे बंधारे फूटण्याच्या वाढत्या घटना अत्यंत चिंताजनक आहेत.वर्तमानात तर पावसाने डोळे वटारले आहे.त्याची दाहकता अधीक वाढत आहे.यामुळे मान्सूनच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते आणि शेतीचे व पशुधनाचे मोठे नुकसान होते.अशा घटनांमुळे परिसरातील जलपातळी खालावून मोठा दुष्काळ ओढवू शकतो.महाराष्ट्रात लघु पाटबंधारे विभागामार्फत’पाणी अडवा,पाणी जिरवा’ या मोहिमेअंतर्गत शेकडो लहान बंधारे आणि मातीचे पाझर तलाव बांधण्यात आले आहेत.परंतु,अतिवृष्टीमुळे हे बंधारे फुटल्यास पुढील अनेक समस्या उद्भवत असतात.उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात ऐन मोक्याच्या क्षणी गावांचा पाणीपुरवठा खंडित होतो.सिंचनासाठी उपलब्ध होणारे पाणी वाहून गेल्यामुळे उभी पिके जळून जातात.अचानक बंधारा फुटल्याने आजूबाजूच्या सखल भागात अचानक पूर येतो,ज्यामुळे जीवित व वित्तहानीचा धोका वाढतो.वाहून आलेल्या गाळामुळे नजीकच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी निकामी होतात.पावसाळ्यापूर्वी स्थानिक प्रशासनाने आणि ग्रामपंचायतींनी सर्व बंधाऱ्यांची पाहणी करून त्यांची डागडुजी करणे गरजेचे आहे.मात्र ती डागडुजी निकृष्ट झाली तर ते बंधारे वारंवार फुटून शेतकऱ्यांच्या शेताचे प्रचंड नुकसान होते.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथे दहा वर्षात तीनदा घडली असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथे दहा वर्षात तीनदा बंधारा वाहून गेल्याची घडली त्यामुळे शेतकरी जीवन नाईक हे हवालदिल झाले आहे.

दरम्यान सन -2022 साली तिसऱ्यांदा तो आपल्या पुराने वाहून गेला आहे.त्यावेळी पहिली भरपाई मिळाली नसताना पुन्हा एकदा या शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे.त्यात दहा गुंठे जमीन होत्याची नव्हती झाली आहे.त्यात त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या दहा वर्षात त्यांचे जवळपास 38 गुंठे क्षेत्र होत्याचे नव्हते झाले आहे.त्याबाबत कोपरगाव येथील तहसीलदार,कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार करून आपल्याला न्याय मिळाला नाही अशी या कुटुंबांची तक्रार आहे.

   सन-२०१४-२०१५ स्राली ४० लाख रुपये खर्चुन रंवंदे गावातील काळधोंडी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधा-याचे काम निकृष्ट प्रतिचे झाल्याने गट नं.४८० क्षेत्रात त्याची मोठी किंमत चुकवावी लागली आहे.या बंधाऱ्याचे बाजुने भरावा न टाकल्याने व त्या बांधकामाला तडे गेल्याने तेथील भराव पूरपाण्याने बाहुन गेला.त्यात जीवन नाईक आणि अनिता नाईक यांचे शेताचे सन-2016-17 सालापासून तब्बल तीनदा मोठे नुकसान झाले आहे.त्यात त्यांची जमीन वाहून गेली आहे.पहिल्यावर्षी 15 गुंठे जमिनीला त्याचा फटका बसला आहे.त्यानंतर दोन वर्षांनी तो पुन्हा वाहून गेला होता.तो दुसऱ्यांदा दुरुस्त करून ही पुन्हा हा बंधारा निकृष्ट झाल्याने तो वाहून गेला आहे.त्यावेळी त्यांचे शेतात जमीन वाहून जाऊन बारा फुटांचा खड्डा पडला होता.त्यावेळी यांचे 20 गुंठ्यातील ठिबक सिंचन आणि पीव्हीसी पाईप वाहून जाऊन 10 लाखांचे नुकसान झाले होते.त्याचा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला.पण त्याची कोणतीही भरपाई मिळाली नाही.तोच पुन्हा एकदा हा बंधारा निकृष्ट काम झाल्याने फुटून गेला होता.त्यावेळी त्यांचे शेतात चिक्कू,आंबा,बांबू आदी फळझाडे आणि अन्य झाडांचे नुकसान होऊन मोठी किंमत चुकवावी लागली आहे.

   दरम्यान सन -2022 साली तिसऱ्यांदा तो आपल्या पुराने वाहून गेला आहे.त्यावेळी पहिली भरपाई मिळाली नसताना पुन्हा एकदा या शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे.त्यात दहा गुंठे जमीन होत्याची नव्हती झाली आहे.त्यात त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या दहा वर्षात त्यांचे जवळपास 38 गुंठे क्षेत्र होत्याचे नव्हते झाले आहे.त्याबाबत कोपरगाव येथील तहसीलदार,कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार करून आपल्याला न्याय मिळाला नाही अशी या कुटुंबांची तक्रार आहे.याबाबत त्यांनी आधी तत्कालीन खा.सदाशिव लोखंडे यांचेकडे तक्रार केली होती.मात्र त्यांना न्याय मिळाला नाही.त्यांनी हाच प्रश्न नुकताच आ.आशुतोष काळे यांच्याकडे मागील सप्ताहात जनता दरबारात उपस्थीत करून तक्रार केली आहे.त्यांनी आपण लेखी कळवून कार्यवाही करतो असे त्यांनी आश्वासन दिले आहे.आता आपल्याला न्याय मिळणार का असा सवाल निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close