जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

कोरोनाच्या रात्रंदिवस बंदोबस्तामुळे पोलिसांचे आरोग्य धोक्यात ?

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

श्रीरामपूर-(प्रतिनिधी)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना लॉक डाऊन तोडून रस्त्यावर विनाकारण चकाट्या मारणाऱ्यांना थोपवणे, कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून दिवसभर ड्युटी करावी लागते तर रात्री चोऱ्या होऊ नये म्हणून गस्त घालावी लागत असल्याने विश्रांती मिळत नसल्याने पोलिसांचे शाररिक व मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तालुक्यातील काही बोटावर मोजण्याइतके गावे वगळल्यास कोणत्याच गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात आले नाही.पोलिसांवरील बंदोबस्तासाचा ताण कमी करण्यासाठी आतातरी प्रशासनाने पुढाकार घेऊन ग्रामसुरक्षा दल व कोरोना रक्षक समिती स्थापन होणे गरजेचे आहे. दिवसभर बंदोबस्तासाठी काही पोलिसांना टप्प्याटप्याने विश्रांती देऊन यातील सदस्यांची मदत घेऊन बंदोबस्त करणे शक्य आहे.

देशात व राज्यात कोरोना विषाणूच्या साथीने कहर केला आहे.या पार्श्वभूमीवर पोलिस,आरोग्य विभाग व प्रशासकीय यंत्रणा चोवीस तास सतर्क झाली आहे.लॉक डाउन झाल्याने त्याचे पालन होते किंवा नाही यासाठी श्रीरामपूर शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक गावात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आधीच शहर व तालुका पोलीस ठाण्यात मंजूर पदांपेक्षा पोलिसांचा तुटवडा आहे.लॉक डाऊन असल्याने अनेक दुकाने बंद आहेत. बाजारपेठ निर्मनुष्य झाली आहे. अत्यावश्यक सेवा असणारी दुकानही लवकर बंद होते.अगदी आठ नऊ वाजताच बाजारपेठ व रस्त्यावर सन्नाटा असतो.ठिकठिकाणी तपासणी नाके बनवण्यात आल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथेच तैनात आहे.सध्या सर्वच ठप्प असल्याने हातावर पोट असणारे लोक त्रास सहन करीत आहेत.सध्या चोऱ्या होत नसल्या तरी सराईत चोर बंदचा फायदा घेत दुकाने फोडण्याची शक्यता नाकारता येत नाही ही काळजीही पोलिसांना घ्यावी लागत आहे.त्यात दिवसभर कोरोनाचा बंदोबस्त व रात्री चोऱ्या होऊ नये म्हणून गस्ती बंदोबस्त त्यामुळॆ सध्या पोलिसांना विश्रांती कमी अन काम जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे फार दिवस चालले तर त्यामुळे पोलिसांचे शाररिक व मानसिक स्वास्थ्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात पाच अधिकारी व ७० पोलीस कर्मचारी तर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दोन अधिकारी व ४२ पोलीस एवढी अत्यल्प पोलिसांची संख्या असून तालुक्याच्या सुमारे सव्वातीन लाख लोकांच्या सरंक्षणाचा भार केवळ ११२ पोलीस कर्मचारी व सात अधिकारी सांभाळत आहेत.

लॉक डाउनची अंमलबजावणी करण्यात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस प्रशासन व आरोग्य तसेच स्वच्छता कर्मचारी तसेच वार्तांकन करण्यासाठी ठिकठिकाणी पत्रकार जात असतात. या सर्वांची अधून मधून प्राथमिक आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.

श्रीरामपूर तालुका हा तसा विस्ताराने मोठा तालुका आहे.तालुक्यातील लोकांची सुरक्षा राहण्यासाठी शहर व तालुका अशी दोन पोलीस ठाणे स्वयंत्ररित्या कार्यरत आहेत.श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासाठी प्रत्यक्षात सुमारे १२८ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत.सुमारे ७३ कर्मचारी कमी आहेत.श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्यासाठी एकूण सुमारे ५७ पोलीस कर्मचारी पदे मंजूर आहेत.मात्र प्रत्यक्षात ४२ कर्मचारी कार्यरत आहेत.येथेही १५ पोलीस कमी आहेत.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलिस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक तर ६३ पुरुष,७ स्त्री असे एकूण ७० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत.तर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक,एक सहायक पोलिस निरीक्षक तर ३६ पुरुष तर ६ स्त्री असे एकुण ४२ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत.तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा तीन लाख असल्याने प्रत्येकावर सुमारे तीन हजार लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close