जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

वडझिरे येथील किरण मोरे झाली फौजदार

जाहिरात-9423439946

निघोज प्रतिनिधी दी 19 :-
पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील किरण तुळशीराम मोरे हिची फौजदार म्हणून निवड झाली. तिच्या निवडीबद्दल वडझिरे येथील विविध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
किरण तुळशीराम मोरे हिची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून तिचे वडील देविभोयरे फाटा येथे टायर पंचर काढण्याचा व्यवसाय करतात . आपल्या घरच्या परिस्थितीवर मात करून यश संपादन केल्याने परिसरातील नागरिकांकडून तिचे कौतुक होत आहे.तिचे शिक्षण वडझिरे येथील माध्यमिक विद्यालय झाले असून उच्च शिक्षण पुणे येथील एमआयटी कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनियर डिप्लोमा केलेला आहे .सन 2017 मध्ये झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिने उज्वल यश संपादन करून तिची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेली आहे. या यशाबद्दल तिचे उद्योजक रामाशेठ एरंडे ,उद्योजक सोपानराव लंके, ज्येष्ठ विधिज्ञ विनायकराव कडकंडे ,पोलीस अधीक्षक नवनाथ ढवळे माजी उपसरपंच किसन चौधरी, बाळासाहेब दिघे ,सरपंच पोपट शेटे ,बबनराव गंधाकते, भिवा एरंडे ,डॉ. हांडे , पोलीस पाटील वसंतराव मोरे ,हरिभाऊ चौधरी सर ,सचिन कडकंडे जयशिग लंके सर विनोद करकंडे विकास शेंडकर ,दत्ता उनवणे आदींनी तिचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close