जाहिरात-9423439946
Uncategorized

कोपरगावात दरोडा,कट्टा लावून रक्कम लुटली,पाच हल्लेखोर पसार

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची हत्त्या ताजी असतानाच आज मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या दरम्यान कोपरगाव शहरातील संभाजी चौकातील मोरे व्यापारी संकुलातील उत्तर बाजूस तळमजल्यावर प्रवीण शोभाचंद कोठारी यांच्या मालकीच्या कोठारी सेल्स कॉर्पोरेशन या कोलगेट कंपनीची डिलरशीप असलेल्या दुकानावर कट्टाधारी पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकून कर्मचाऱ्यांकडिल सुमारे सत्तर हजारांची रक्कम लंपास करून पुढील मोठ्या रकमेवर डल्ला मारण्याआधीच आरडाओरडा झाल्याने पळून जाण्याचा प्रसंग ओढवला आहे.या घटनेने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

या दुकानावर दोन दिवस काही अज्ञात दरोडेखोरांनी पाळत ठेवली होती. व नेमकी रकमा जमा होण्याची वेळ हेरून त्यांनी मंगळवारी रात्री साडे आठ वाजता गावठी कट्ट्याचा वापर करत अंगांत काळ्या रंगाचे जॅकेट,पायात बूट व तोंडे बांधून या दुकानात प्रवेश मिळवला व समोरच कोठारी यांचे कर्मचारी व लेखनिक हरीश पठारे हे अन्य कर्मचाऱ्यांकडून हिशेब घेत असताना अनाधिकाराने दुकानात प्रवेश मिळवलेल्या दरोडेखोरांनी थेट गावठी कट्टा कानाला लावला व दुसऱ्याने थेट गल्ल्यात हात घालून सत्तर हजार रुपये हस्तगत केले.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव शहरातील छत्रपती संभाजी चौकात मोरे व्यापारी संकुल असून या ठिकाणी उत्तर बाजूस तळमजल्यावर आनंद ऋषीजी लॅब शेजारी प्रवीण कोठारी यांच्या मालकीचे “कोठारी सेल्स कॉर्पोरेशन” नावाचे कोलगेट विक्रीचे ठोक मालाची एजन्सी आहे.ते आपला माल दिवसभर आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत विकून सायंकाळच्या सुमारास त्यांचा हिशेब घेऊन रोकड जमा करण्याचा प्रघात आहे.दरम्यान त्यांच्या या दुकानावर गेले दोन दिवस काही अज्ञात दरोडेखोरांनी पाळत ठेवली होती. व नेमकी रकमा जमा होण्याची वेळ हेरून त्यांनी मंगळवारी रात्री साडे आठ वाजता गावठी कट्ट्याचा वापर करत अंगांत काळ्या रंगाचे जॅकेट,पायात बूट व तोंडे बांधून या दुकानात प्रवेश मिळवला व समोरच कोठारी यांचे कर्मचारी व लेखनिक हरीश पठारे हे अन्य कर्मचाऱ्यांकडून हिशेब घेत असताना अनाधिकाराने दुकानात प्रवेश मिळवलेल्या दरोडेखोरांनी थेट गावठी कट्टा कानाला लावला व दुसऱ्याने थेट गल्ल्यात हात घालून सत्तर हजार रुपये हस्तगत केले.त्यांनतर त्यांनी आपला मोर्चा आतील दालनात प्रवेश करण्यासाठी वळवला असताना हि बाब कोठारी यांच्या लक्षात आली त्यांनी आत येत असलेल्या दरोडेखोरांच्या प्रतिकार करून आतील बाजूने दरवाजा बंद केल्याने पुढील अनर्थ टाळला आहे.दरोडेखोरांनी हा दरवाजा लाथ व कोयत्याने तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला मात्र तो सपशेल अपयशी ठरला आहे. दरम्यान बाकी कर्मचाऱ्यांनी आरडा ओरडा केल्याने पकडले जाण्याच्या भीतीने गाळण उडवून दरोडेखोरांनी धूम ठोकली आहे.हा खेळ अवघा दीड मिनिटात झाला असून घटनेनंतर कोठारी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्याशी संपर्क साधला ते अवघे काही मिनिटात आले मात्र तो पर्यंत या दरोडेखोरांनी आपल्या विना क्रमांकाच्या पल्सरवरून धूम ठोकली होती.

या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.पोलिसानी घनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून पुढील कार्यवाही सुरु केली आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनीही भेट दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close