आंदोलन
कंपनीच्या पाण्यामुळे भुजल प्रदूषित,अनेकांना त्वचा रोग,मासेही मृत !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या उत्तरेस आणि येवला तालुक्याच्या सीमारेषेवर असलेल्या रासायनिक कारखान्याने आपले सांडपाणी कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव,नांदेसर आणि बदापूर येथील ओढ्यात सोडून तेथील भुजलसाठा मोठ्या प्रमाणावर प्रदूषित केला असून त्याची किंमत येथील शेतकरी आणि महिला विविध आजारांनी मोजत असून शेततळ्यातील मासे मृत झाले आहे.याचा कोपरगाव आणि येवला प्रशासनाने बंदोबस्त केला नाही तर मोठे जनआंदोलन केले जाईल असा इशारा येथील कार्यकर्ते नांदेसर येथील सरपंच संतोष जाधव,नाटेगावचे सरपंच विकास मोरे आणि नानासाहेब मोरे यांचेसह ग्रामस्थानी दिल्याने खळबळ उडाली आहे.

“आम्ही शेतकऱ्यांनी याबाबत नाशिक येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाला लेखी तक्रार करून कळवले आहे.त्याची दखल घेऊन प्रदूषण मंडळाचे अधिकारी विद्यासागर किल्लेदार यांनी सदर कंपनीस दिनाक 06 मे 2026 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.मात्र अद्याप कारवाई झालेली नाही”-नानासाहेब मोरे,शेतकरी,नाटेगाव,ता.कोपरगाव.
कारखान्यांमुळे होणारे भूजल प्रदूषण ही आज एक अत्यंत गंभीर आणि जीवघेणी समस्या बनली आहे.कारखान्यांमधून सोडण्यात येणारे दूषित आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट जमिनीत किंवा जवळच्या जलस्रोतांमध्ये मिसळते,ज्यामुळे पिण्याचे पाणी विषारी बनते.कारखान्यांमधील रसायने,तेल आणि जड धातूंयुक्त सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता जमिनीत मुरले जाते.औद्योगिक घातक कचऱ्याची योग्य वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट न लावल्याने विषारी घटक भूजलात उतरतात.परिणामी आरोग्यावर व पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम होत असून त्यातून भयंकर आजार उद्भवत आहेत.या विषारी आणि दूषित पाणी प्यायल्याने कर्करोग किडनीचे आजार,त्वचारोग आणि श्वसनाचे गंभीर विकार उद्भवत आहेत.याशिवाय दूषित पाण्यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत असून आसपासचे जलचर आणि पशुधन मृत्यूमुखी पडत आहेत.गोदावरी नदी नंतर अशीच गंभीर घटना कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव,येवला तालुक्यातील सीमावर्ती असलेल्या बदापूर,नांदेसर आदी गावात उद्भवली आहे.त्याला कारण आहकृष्णा इंझोटेक प्रायव्हेट लिमिटेड’ ही गट क्रमांक 127/2 मध्ये उभारलेली कंपनी.ही कंपनी माशांच्या खवल्यापासून प्रोटीन बनवत असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.

दरम्यान या दूषित पाण्याचा फटका बसलेली बदापूर तालुका येवला येथील रहिवासी महिला काजल शिवाजी अभंग यांनी आपल्याला झालेला त्वचा रोग दाखवून आपण यावर आत्तापर्यंत 05-06 लाख रुपये खर्च करून तो बरा झाला नसल्याचा आरोप कंपनीवर केला आहे.त्यामुळे आगामी काळात प्रदूषण मंडळ या कंपनीवर काय कारवाई करणार याकडे कोपरगाव आणि येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सदर कंपनी प्रकिया करून उरलेले त्याचे सांडपाणी बेदरकारपणे थेट नांदेसर नाटेगाव,बदापूर येथील ओढ्यात सोडून देण्यात आले आहे.परिणाम असा विपरीत झाला आहे की,याभागात मोठ्या प्रमाणावर भुजल प्रदूषित झाले आहे.ते ना जनावरांना पिण्यालायक राहिले ना माणसांना.या शिवाय येथील अनेक महिला आणि ग्रामस्थाना असह्य त्वचा रोगांचा सामना करावा लागत आहे.शिवाय नजीकच्या शेतकऱ्यांच्या शेततळ्यात असलेले मासे मरून पडले आहे.त्यातून पाणी किती प्रदूषित झाले आहे याचा अंदाज येत आहे.त्यामुळे संतप्त ग्रामस्थानी याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बातचीत करून या ठिकाणी निमंत्रित केले होते.त्यावेळी त्यांच्या बोलण्यात सत्यता आढळून आली आहे.त्यावेळी जवळपास 80 ते 100 ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांनी याबाबत आमचे प्रतिनिधीस समक्ष नेऊन घटनास्थळ दाखवले आहे.आता अलीकडील काळात या कंपनीने सदरचे पाणी एका सुमारे 05 एकर क्षेत्रात पूर्व-पश्चिम आयताकृती खड्डे घेऊन त्यात सोडले असल्याचे दिसून आले आहे.त्या खड्ड्यानजीक लावलेली नारळाची झाडे जळून चालली असल्याचे दिसून आले आहे.मात्र ते पाणी जवळच्या विहिरी आणि विंधनविहिरी दूषित करत असल्याची बाब लपून राहिली नाही.सदरचे पाणी आपल्या पिकांना दिल्यावर त्यात मानवी शरीरावर प्रतिकूल परिणाम होत आहे.आगामी काळात जमीन नापीक होण्याचा धोका उद्भवणार असल्याचे ग्रामस्थानी बोलून दाखवले आहे.

दरम्यान यावेळी बोलताना नानासाहेब मोरे म्हणाले की,”आम्ही याबाबत नाशिक येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाला लेखी तक्रार करून कळवले आहे.त्यांनी प्रदूषण मंडळाचे अधिकारी विद्यासागर किल्लेदार यांनी दखल घेऊन सदर कंपनीस दिनाक 06 मे 2026 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती देऊन त्याची प्रत आमचे प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान यावेळी या दूषित पाण्याचा फटका बसलेली बदापूर तालुका येवला येथील रहिवासी महिला काजल शिवाजी अभंग यांनी आपल्याला झालेला त्वचा रोग दाखवून आपण यावर आत्तापर्यंत 05-06 लाख रुपये खर्च करून तो बरा झाला नसल्याचा आरोप कंपनीवर केला आहे.त्यामुळे आगामी काळात प्रदूषण मंडळ या कंपनीवर काय कारवाई करणार याकडे कोपरगाव आणि येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे यांनी,”या शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील,उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांचेसह शेतकरी संघटना या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास दिला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सदर प्रसंगी नामदेव मोरे,सुरेश बोरजे,राजेंद्र मोरे,माधव मोरे, कैलास मोरे,संतोष गायकवाड,दिलीप मोरे,भाऊसाहेब मोरे,पप्पू मोरे,बाळासाहेब मोरे,मारुती मोरे,गोपीनाथ मोरे,विलास मोरे,मीनानाथ मोरे,द्न्यनेश्वर मोरे,सतीश मोरे,बाबासाहेब मोरे, संतोष बंडके,श्री.डफळ सर,कैलास मोरे,बाळासाहेब गाजी मोरे,ललित वाणी नाना कटके,श्रावण कटके आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.



