पाणी पुरवठा योजना
जल जीवनच्या प्रलंबित कामांकडे…या आमदाराने वेधले लक्ष

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील रखडलेल्या जलजीवन मिशनच्या सुधारित पाणीपुरवठा योजनांना तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात यावी.तसेच महत्त्वाच्या राज्य व जिल्हा मार्गांच्या विकासासाठी निधी द्यावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे हि मागणी केली आहे.

“दरम्यान भागवतवाडी ते झगडे फाटा,साईबाबा तपोभूमी ते शिंगणापूर रेल्वे बोगदा,देर्डे फाटा ते कोळगाव पाटी आणि कोपरगाव रेल्वे स्टेशन ते संवत्सर चौफुली हे रस्ते राज्य मार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग असून या मार्गांवरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड व प्रवासी वाहतूक होते.या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली.त्यामुळे वाहन चालक व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो परिणामी मोठ्या संख्येने अपघात होत आहेत”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा मतदार संघ.
केंद्र सरकारच्या निधीच्या टंचाईमुळे आणि आर्थिक अनियमिततेमुळे महाराष्ट्रात जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची जवळपास २४ ते २५ हजार कामे ठप्प झाली आहेत.ठेकेदारांची मोठी देणी थकल्यामुळे हा तिढा निर्माण झाला आहे.अनेक ठेकेदारांनी आत्महत्या केल्या आहेत.राज्यात ५१,५६० पेक्षा जास्त योजना मंजूर करण्यात आल्या होत्या,ज्यातून ग्रामीण भागातील प्रत्येक घराला दररोज ५५ लिटर शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट होते.अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 28 योजना ठप्प आहेत.यातील सुमारे २५ हजार ६१ योजनांचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे.गेल्या अडीच तीन वर्षाच्या काळात केंद्राकडून राज्याला अपेक्षित निधी मिळालेला नाही.आर्थिक वर्षाच्या अखेरीस अत्यंत नाममात्र निधी मिळाल्यामुळे राज्य शासनाचा पाणीपुरवठा विभाग हतबल झाला आहे.जल जीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या ठेकेदारांची तब्बल १५ हजार कोटींहून अधिक रुपयांची देणी प्रलंबित आहेत.मागील कामांची बिले मिळाल्याशिवाय नवीन कामे किंवा रखडलेली कामे पुढे न करण्याचा पवित्रा ठेकेदारांनी घेतला आहे,परिणामी ज्यामुळे योजना अपूर्ण आहे त्यांना मोठा खोडा निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर आ.काळे यांनी औचित्याच्या मुद्यावर हा प्रश्न उपस्थित केला आहे.याला महत्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण 52 जलजीवन योजना मंजूर असून यातील 19 हस्तांतरण झाल्या आहेत तर 06-07 किरकोळ कारणांनी प्रलंबित आहेत.तर 26 योजना या 70-90 टक्के पूर्ण असून उर्वरित कामे बाकी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.यात जीवन प्राधिकरणाच्या योजनाचा समावेश नाही.मात्र या सर्व योजना कधी पूर्ण होणार याकडे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांचे चातकासारखे लक्ष लागून राहिले आहे.
त्यांनी या प्रकरणी पुढे बोलताना म्हटले आहे की,”कोळपेवाडी,सुरेगाव,कुंभारी,मायगाव देवी,धारणगाव,मळेगाव थडी,रवंदे,चासनळी,रांजणगाव देशमुख,शिंगणापूर,वारी-कान्हेगाव,शिंगवे आणि नपावाडी या गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या.मात्र,योजना तयार करताना अनेक तांत्रिक व स्थानिक बाबींचा पुरेसा विचार झाला नाही.दीड वर्षांपूर्वी सुधारीत प्रस्ताव सादर केला.त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही.हि कामे ठप्प आहे .परिणामी ग्रामस्थाना शुद्ध पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.त्यामुळे या कामांना गती मिळणे गरजेचे आहे.

दरम्यान भागवतवाडी ते झगडे फाटा,साईबाबा तपोभूमी ते शिंगणापूर रेल्वे बोगदा,देर्डे फाटा ते कोळगाव पाटी आणि कोपरगाव रेल्वे स्टेशन ते संवत्सर चौफुली हे रस्ते राज्य मार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग असून या मार्गांवरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड व प्रवासी वाहतूक होते.या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली.त्यामुळे वाहन चालक व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.अपघात होत आहेत.शासनाच्या इतर कोणत्याही पायाभूत सुविधा विकास योजनेत समावेश करून या रस्त्यांसाठी आवश्यक निधी मंजूर करावा अशी मागणी आ.काळे यांनी शेवटी केली आहे.दरम्यान ही दोन्ही प्रश्न आ.काळे यांनी उपस्थित केल्याने तालुक्यातील मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे.



