गुन्हे विषयक
तरुणाचा चाकू हल्ला,एक जखमी,अद्याप गुन्हा नाही?

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या निवारा येथील तरुण गणेश सुधीर जोशी याने त्याचे शेजारी असलेले इसम निलेश चंद्रकांत राजुरकर यांच्यावर अचानक चाकू हल्ला चढवला असून त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांचेवर कोपरगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.त्यामुळे निवारा आणि कोपरगाव शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान या प्रकरणी अद्याप शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.

दरम्यान या घटनेतील आरोपी अद्याप अटक नसून त्याबाबत अद्याप कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.मात्र उशिरा तो दाखल होणार असल्याचे माहिती आमच्या प्रतिनिधीस समजली आहे.सदरचा हल्लेखोर इसम हा मनोरुग्ण असल्याची चर्चा नागरिकांत सुरू होती.त्याच्याकडील हत्यार अद्याप जप्त करण्यात आलेले नाही.या आरोपीवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोपरगाव शहर आणि तालुक्यातील गुन्हेगारी कायम चिंतेची बाब राहिली आहे.त्यामुळे त्याचा आलेख कायम उंचावत गेला आहे.वर्तमानात अनेक अधिकारी आले आणि गेले मात्र त्यात फरक पडला नाही.याबाबत आ.आशुतोष काळे यांनी विधानसभेत आवाज उठवला मात्र त्यात अद्याप काहीही फरक पडलेला नाही.अशीच एक घटना आज सकाळी 11.30 वाजता निवारा या उपनगरात घडली आहे.यातील जखमी इसम निलेश राजुरकर आणि हल्लेखोर तरुण हे एकाच गल्लीत आणि शेजारी शेजारी राहत आहे.मात्र आज अचानक आरोपी तरुण गणेश सुधीर जोशी यांनी निलेश राजुरकर यांच्यावर चाकू हल्ला चढवला आहे.तो इतका अनपेक्षित होता की जखमी इसम निलेश राजुरकर यांना त्याचा साधा अंदाजही आला नाही.परिणामी त्यांना सावरण्यास वेळ न मिळाल्याने त्यात त्यांचा उजव्या हाताच्या पंज्याच्या वर त्यांना या चाकू हल्ल्याने जवळपास नऊ टाके पडले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या घटनेने जवळचे नागरिक घाबरून गेले होते.त्यांनी ही बाब येथील नगरसेवक जनार्दन कदम यांना कळवली होती.दरम्यान नजिकच्या नागरिकांनी आरोपीस ताब्यात घेऊन त्यास एका घरात डांबून ठेवले होते.याबाबत कदम यांनी तातडीने कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप सोन्ने यांना कळवली होती.त्यांनी तातडीने सदर ठिकाणी पोलिस गाडी पाठवून आरोपीस ताब्यात घेतले आहे.त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.कदम यांनी जखमी राजुरकर यांना तातडीने उपचारार्थ शहरातील डॉ.फडके हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले आहे.त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

दरम्यान याबाबत अद्याप कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.मात्र उशिरा तो दाखल होणार असल्याचे माहिती आमच्या प्रतिनिधीस समजली आहे.सदरचा हल्लेखोर इसम हा मनोरुग्ण असल्याची चर्चा नागरिकांत सुरू होती.त्याच्याकडील हत्यार अद्याप जप्त करण्यात आलेले नाही.मात्र नागरिकांच्या सजगतेमुळे मात्र एक जणाचा प्राण वाचला असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.



