जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

वाढीव घरपट्टीचा विषय तापला,आंदोलन सुरू !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव नगरपरिषदेने केलेल्या अवाजवी वाढीव घरपट्टी व नगरपरिषदेच्या इतर चुकीच्या निर्णयांविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सोमवार दि.२२ रोजी सकाळी १० वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून नागरिकांनी त्याचे स्वागत केले आहे.

वाजवी वाढीव घरपट्टी व नगरपरिषदेच्या इतर चुकीच्या निर्णयांविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव शहरात सुरू केलेले धरणे आंदोलन.

दरम्यान आज दुपारी 04 वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस येऊनही आंदोलन कर्त्यांनी आपली भूमिका ठाम ठेवली असल्याचे दिसून आले आहे.याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.उद्याही हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे माजी शहर प्रमुख सुनील गंगूले यांनी जाहीर केले आहे.

     याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेने केलेली अवाजवी घरपट्टी वाढ हा अत्यंत गंभीर व संवेदनशील विषय बनला असल्याचे दिसून आले आहे.वाढीव कर आकारणीमुळे सर्वसामान्य नागरिक,ज्येष्ठ नागरिक व मध्यमवर्गीयांचे आर्थिक बजेट कोलमडते या शिवाय त्यांचे कंबरडे मोडते त्यामुळे कोपरगाव शहर परिसरात पालिकेविरुद्ध नाराजी पसरली आहे.हा अन्याय दूर करण्यासाठी कायदेशीर व संघटित पावले उचलणे गरजेचे आहे.या पट्टी विरुद्ध नगरपरिषदेने दि.06 जुलै 2026 पर्यंत आपल्या लेखी तक्रारी नोंदवण्यासाठी आवाहन केले आहे.त्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने निषेध नोंदवला असून आज त्या विरोधात रणशिंग फुंकले आहे.त्यासाठी हरकती नोंदविण्यासाठी आंदोलनस्थळी आक्षेप नोंदविण्यासाठी मदत कक्ष सुरू केला असून त्याला नागरिकांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.कर आकारणीच्या मूल्यांकनात काय चूक आहे,याचा पुरावा सादर करण्याची आवश्यकता आहे.शिवाय या विरोधात महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम,१९६५ च्या तरतुदीनुसार घरपट्टीच्या अवाजवी वाढीविरोधात थेट न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग उपलब्ध आहे.मात्र या पातळीवर आ.काळे यांचे संघटनेनं काय भूमिका घेतली हे स्पष्ट होऊ शकले नाही.मात्र उशिरा याबाबत आमच्या प्रतिनिधीने विरोधी गटाच्या प्रमुख गौरी पहाडे यांचेशी संपर्क साधला असता याबाबत आम्ही भूमिका घेतली नाही मात्र उद्या यावर निश्चित भूमिका जाहीर करून असे नागरिकांना आश्र्वासित केले आहे.

 

दरम्यान या आंदोलन प्रश्नी ,”भारतीय जनता पक्षावर निराधार आरोप व टीका करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कोपरगावच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे. एकीकडे राज्यातील महायुती सरकारमध्ये आमदार काळे यांनी सत्तेचा उपभोग घ्यायचा. त्यांच्या पक्षश्रेष्ठींना देखील फसवायचे आणि दुसरीकडे त्यांच्या चेले चपाट्यांनी भारतीय जनता पक्षावर पातळी सोडून टीका करायची, हा दुटप्पीपणा जनतेच्या लक्षात आला असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे कोपरगाव शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी केली आहे.

  सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषद विरोधी गट नेते गौरी मंदार पहाडे,शहराध्यक्ष सुनील गांगुळे,माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,मंदार पहाडे,रमेश गवळी,मेहमूद सय्यद,संदीप कपिले,निर्मला आढाव,जनार्दन कदम,बाळासाहेब रुईकर,इम्तियाज अत्तार.माधवी वाकचौरे,सोनम त्रिभुवन,वाल्मीक लहिरे,सोमनाथ आढाव,विजय त्रिभुवन,राजेंद्र वाकचौरे,नवाज कुरेशी,दिनार कुदळे,कृष्णा आढाव,फकीर कुरेशी,मुकुंद भुतडा,डॉ.तुषार गलांडे,सचिन गवारे,दिनकर खरे आदीसह  बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

वैभव आढाव,शहर प्रमुख,भाजप कोपरगाव शहर.

   दरम्यान यावेळी जेष्ठ नागरिक मंचच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याची माहिती मंदार पहाडे यांनी दिली मात्र याबाबत आमच्या प्रतिनिधीने संघटनेचे अध्यक्ष विजय बंब यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी घरपट्टी वाढविण्यास वैयक्तिक विरोध केला असल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे.मात्र संघटनेच्या पाठिंब्याबाबत मौन पाळले आहे.

   दरम्यान आज दुपारी 04 वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस येऊनही आंदोलन कर्त्यांनी आपली भूमिका ठाम ठेवली असल्याचे दिसून आले आहे.याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.उद्याही हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे माजी शहर प्रमुख सुनील गंगूले यांनी जाहीर केले आहे.आज आंदोलन कर्त्यांची भेट घेण्यासाठी कोणीही प्रशासकीय अधिकारी आला नसल्याची माहिती हाती आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close