Uncategorized
दिवसभरात कोपरगाव तालुक्यात १३ रुग्णांची भर !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात पुन्हा कोरोना विषाणूच्या साथीने आता मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले असून काल कोपरगाव शहरात १६ रुग्ण आढळल्यानंतर आज दुपारी ७.३० पर्यंत पाच रस्ता लुटीतील आरोपींसह सायंकाळ ७.३० पर्यंत (काल उशिराने झालेली ३ रुग्णांची नोंद सकाळी जाहीर केली ती वगळून) एकूण १३ रुग्णांची नोंद झाली असल्याने आता कोपरगावात एका वरचढ एक कोरोना बाधितांचे विक्रम नोंदवले जात असल्याने नागरीकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
सकाळीच आमच्या प्रतिनिधीने रस्ता लुटीतील पाच आरोपी बाधित असल्याची माहिती दिली होती.दुपारी आलेल्या माहिती नुसार आरोग्य विभागाने १७४ संशयित रुग्णांचे श्राव तपासणीसाठी पाठवले होते.त्यांचे अहवाल दुपारी ४.३० सुमारास प्राप्त झाले असून त्यातील १२ रुग्ण बाधित निघाले आहे तर १६२ निरंक आले आहे.त्यात स्वामी समर्थनगर येथील ३० वर्षीय महिला,इंदिरानगर येथील ६० वर्षीय पुरुष, कोळपेवाडी येथील ५८ वर्षीय पुरुष,सुरेगाव येथील ५५ वर्षीय तर तीळवणी येथील २८ वर्षीय तरुनाचा खाजगी प्रयोग शाळेतील अहवाल आला असून गांधीनगर येथील ४५ वर्षीय महिला व ६० वर्षीय पुरुष,गोरोबा नगर येथील ४५ वर्षीय महिला,समतांनगर येथील ३८ वर्षीय पुरुष,व सायंकाळी कोपरगाव तालुक्यात १३ बाधित रुग्णांची यादी समोर आली आहे.
कोपरगाव तालुक्यात दोन दिवसांपूर्वी पुन्हा तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून काल १० संशयित रुग्णांचे अहवाल नगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते त्यातील ७ निरंक आले असून ३ बाधित आले आहे त्यात एक राम मंदिर रोड येथील ३५ वर्षीय महिला तर लक्ष्मीनगर येथील एक ३५ वर्षीय महिला आणि सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील एक ४२ वर्षीय महिला बाधित आढळली होती.तर आज सकाळीच आमच्या प्रतिनिधीने रस्ता लुटीतील पाच आरोपी बाधित असल्याची माहिती दिली होती.दुपारी आलेल्या माहिती नुसार आरोग्य विभागाने १७४ संशयित रुग्णांचे श्राव तपासणीसाठी पाठवले होते.त्यांचे अहवाल दुपारी ४.३० सुमारास प्राप्त झाले असून त्यातील १२ रुग्ण बाधित निघाले आहे तर १६२ निरंक आले आहे.त्यात स्वामी समर्थनगर येथील ३० वर्षीय महिला,इंदिरानगर येथील ६० वर्षीय पुरुष,सुरेगाव येथील ५८ वर्षीय पुरुष.गांधीनगर येथील ४५ वर्षीय महिला व ६० वर्षीय पुरुष,गोरोबा नगर येथील ४५ वर्षीय महिला,समतानगर येथील ३८ वर्षीय पुरुष आदींचा समावेश असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.तर खाजगी प्रयोग शाळेतील तीळवणी येथील एकाची उशिरा भर पडली आहे.हि सलग तिसऱ्या दिवशी रुग्णांची १३ इतकी वाढ नोंदवली गेली असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
काल सर्वाधिक १६ रुग्ण वाढल्याची हि पहिलीच वेळ होती तर आज त्या खालोखाल १३ रुग्ण नोंदवले गेले आहे.या बाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी उशिरा बातमी दिली आहे.त्यामुळे नागरिकांत या साथीची भीती वाढली आहे.आज कोपरगाव शहरात संचारबंदी तालुका प्रशासनाने जाहीर केलेली होती.उद्या बकरी ईद असल्याने आज मुस्लिम बांधवाच्या सोयीसाठी हा बदल केलेला आहे.आता आज नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढ हि खूपच चिंतेची बाब कोपरगावकरांसाठीं निर्माण झाली आहे.