जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दोन लाखांसाठी विवाहित महिलेचा छळ,05 जणांवर गुन्हा!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील माहेर असलेल्या व श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील सासर असलेल्या विवाहित महिला लक्ष्मी कृष्णा वायकर (वय -20) हिला,”आपल्या माहेरातून नवऱ्याला होमगार्ड पोलिस होण्यासाठी दोन लाख रुपये आणावे यासाठी तिचा पती कृष्णा भास्कर वायकर,सासरा भास्कर राणु वायकर,सासु मथुरा भास्कर वायकर,नणंद शीतल सोपान पानगव्हाणे,चुलत दिर कळू उर्फ सहादू वायकर यांनी तिचा उपाशी पोटी ठेवून तिला शारीरिक,मानसिक छळ करून तिला नांदविण्यास नकार दिल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व प्रतिमा संकल्पित.

“सासरच्या मंडळींनी आपल्या नवऱ्याला पोलिस भरतीचे सरावासाठी नगर येथे जायचे असून त्याला होमगार्ड पोलिस व्हायचे आहे.त्यासाठी,” तू,माहेराहून 02 लाख रुपये आण” असा तगादा लावला होता.मी त्यांना सांगायचे की माझी आई एकटी आहे.तिची आर्थिक ऐपत नाही,ती एवढे पैसे देऊन शकत नाही”असे सांगूनही काही उपयोग आला नाही.त्यांनी वरचे आर जास्त त्रास देणे सुरू केले असल्याचा आरोप फिर्यादी महिला लक्ष्मी कृष्णा वायकर हिने केला आहे.

     हुंड्यासाठी महिलांचा मानसिक व शारीरिक छळ हा अतिशय गंभीर आणि चिंतेचा विषय असून यामुळे महिलांच्या मानसिक आरोग्यावर व जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होत आहेत.या समस्येविरोधात लढण्यासाठी आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतात कडक कायदे व मदत यंत्रणा उपलब्ध आहेत.माहेरवरून पैसे किंवा वस्तू आणण्यासाठी मानसिक दबाव टाकणे.घरच्यांसमोर किंवा समाजात महिलेचा वारंवार अपमान करणे.घालून पाडून बोलणे,विनाकारण संशय घेऊन मानसिक त्रास देणे.बाहेर पडण्यावर,लोकांशी बोलण्यावर निर्बंध आणणे आदी त्रास देण्याच्या घटना होत असतात.परिणामी त्यामुळे कौटुंबिक शांतता भंग होत असते.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत घडली असून यातील महिलेचे माहेर येथील असून तिचा विवाह श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील तरुण कृष्णा वायकर यांचेशी मोठ्या डामडौलात आई आणि वडिलांनी लावून दिला होता.नव्या लावल्याचे नऊ दिवस संपल्यावर सासरच्या मंडळींनी आपले दात दाखवण्यास सुरुवात केली असल्याचे उघड झाले आहे.या दांपत्याला दोन मुले असून यातील पहिला मुलगा आहे तर दुसरी मुलगी झाल्यानंतर आपल्याला सासरच्या मंडळींनी त्रास द्यायला सुरुवात केली असल्याचा सदर महिलेने आरोप केला आहे.त्यानंतर ते मला घेण्यासाठी आले नाही.त्यावेळी माहेरच्या मंडळींनी मध्यस्थ घालून एक बैठक घेऊन मार्ग काढून जानेवारी 2025 मध्ये मला सासरी पाठवून दिले होते.त्यानंतर मला सातत्याने घरातील नवरा,सासु,सासरे,नणंद हे आडून पाडून बोलत होते.काम चुकल्यास कायम त्रास देण्याचे काम करत होते.त्यानंतर त्यांनी नवऱ्याला पोलिस भरतीचे सरावासाठी नगर येथे जायचे असून त्याला होमगार्ड पोलिस व्हायचे आहे.त्यासाठी,” तू,माहेराहून 02 लाख रुपये आण” असा तगादा लावला होता.मी त्यांना सांगायचे की माझी आई एकटी आहे.तिची आर्थिक ऐपत नाही,ती एवढे पैसे देऊन शकत नाही”असे सांगूनही काही उपयोग आला नाही.त्यांनी वरचे आर जास्त त्रास देणे सुरू केले असल्याचा आरोप केला आहे.मला त्यानंतर माहेरी पाठवून दिले होते.वारंवार विनवणी करून ही ते नेण्यास येत नव्हते.

  दरम्यान त्यानंतर आपण अहिल्यानगर येथील जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे भरोसा सेल मध्ये 28 मार्च 2026 रोजी अर्ज दिला होता.त्यांना तारखेसाठी बोलावले गेले पण त्यासाठी ते हजर राहिले नाही.त्यानंतर आपण कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात पती कृष्णा भास्कर वायकर,सासरा भास्कर राणु वायकर,सासु मथुरा भास्कर वायकर,नणंद शीतल सोपान पानगव्हाणे,चुलत दिर कळू उर्फ सहादू वायकर यांचे विरुद्ध फिर्याद दाखल करण्यास आले असल्याचे सांगितले आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव  तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रमांक 258/2026भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 85,115(2).352,351(2) अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल सचिन कुडके हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close