जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

विधानपरिषदेत शेतकऱ्यांचा आवाज उठवणार-…यांचे प्रतिपादन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   शेतमालाला योग्य दर आणि बाजारभाव मिळाला पाहिजे,ही आमली भूमिका आहे.वरिष्ठ सभागृहात शेतकरी हितासाठी सरकारकडे आग्रह धरणारा हक्काचा प्रतिनिधी म्हणून काम करणार असून तुमच्या न्याय आणि हक्कासाठी आवाज उठवणारा व्यक्ती विधान परिषदेमध्ये गेलेला आहे,या माध्यमातून शेतकऱ्यांचे हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आ.विवेक कोल्हे यांनी पाथरे येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे नुकताच विधान परिषदेचे आ.विवेक कोल्हे यांच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला तो क्षण.

राज्यातील कांदा उत्पादक यांच्या कष्टाची माती होताना दिसून येत असून एक रुपये किलोने कांदा खरेदी करताना कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि व्यापारी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून शेतकरी संतप्त झाला असल्याच्या पार्श्वभूमीवर आ.विवेक कोल्हे यांचे हे विधान आल्याने याकडे सिन्नर,कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

   सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे नुकताच विधान परिषदेचे आ.विवेक कोल्हे यांच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्ह्याचे खा.राजाभाऊ वाजे,रतीय जनता पक्षाचे नेते भारतशेठ कोकाटे,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चव्हाणके,माजी पंचायत समिती सभापती बाळासाहेब वाघ,माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठलराजे भोसले,शैक्षणिक क्षेत्रातील राजेश गडाख,प्रणव पवार,श्री.कथले सर,अंबादास कदम,सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,पाथरे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक,कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ,कोपरगाव नगरपालिकेचे उपाध्यक्ष जितेंद्र रणशूर व सर्व नगरसेवक,कोपरगाव बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळ,शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे तसेच कार्याध्यक्ष पिराजी पवार,सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती,उपसभापती व संचालक मंडळ,खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष व संचालक मंडळ,सिन्नर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक,ग्रामपंचायतींचे पदाधिकारी उपस्थित होते.

   यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”या आमदारकीचा सातबारा जरी माझ्या नावावर असला,तरी या सातबाराच्या पोट हिस्सामध्ये सर्व कार्यकर्त्यांचा समान हिस्सा आहे.संजीनी समूह आणि पाथरे पंचक्रोशीचे जिव्हाळ्याचे नाते आहे.संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीपासून या भागातील अनेक सभासद,कर्मचारी आणि शेतकरी ‘तीन रुपये हजेरी’ प्रमाणे कामासाठी येत असत.त्या काळापासून सुरू झालेला हा संबंध आज तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचला असून,अनेक ज्येष्ठ सहकाऱ्यांनी माजीमंत्री स्व.कोल्हे यांचेसोबत कार्य केले आहे.त्यांच्या योगदानाचे स्मरण करणे ही आजची गरज आहे.पाथरे,शहा,पंचाळे परिसर पूर्वी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता.स्व. कोल्हे १९६२ साली पंचायत समितीचे सभापती झाले,तर त्याआधीच १९५८ साली संजीवनी सहकारी साखर कारखान्याची पायाभरणी करण्यात आली होती.त्या काळापासून आजपर्यंत स्व.कोल्हे यांचे या भागावर विशेष प्रेम आणि जिव्हाळा कायम राहिला आहे.तसेच आपण तो जिव्हाळा यापुढेही असाच जपून ठेवणार आहे.असे सांगून पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहे.

  यावेळी आर.बी.चिने,शिवाजी चिने,माजी संचालक अशोक नरोडे,दौलत चिने,पाथरे खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच व सदस्य मंडळ,तसेच पाथरे विकास सोसायटीचे अध्यक्ष व संचालक मंडळ उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन जालिंदर थोरात व समस्त ग्रामस्थ,पाथरे यांनी केले होते.

   सदर कार्यक्रमाची प्रस्तावना जालिंदर थोरात यांनी केली तर सूत्रसंचालन मनोज गवळी यांनी केले,तर उपस्थितांचे आभार कृष्णा घुमरे यांनी मान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close