धार्मिक
पावसासाठी…या गावात ‘पर्जन्य याग’ उत्साहात संपन्न !

न्यूजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
संवत्सर येथील पौराणीक श्रुगेश्वर महाराज मंदीरात सालाबादप्रमाणे ऋषी भोजन आणि पर्जन्य याग यज्ञाचे आयोजन जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प.पु.रमेशगिरी महाराज यांचेसह मान्यवर संताचे प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात करण्यात आले आहे.

स्व.नामदेवराव परजणे यांनी चालू केलेल्या ऋषी भोजनास सन-1995 पासून राजेश परजणे हे गावचे सरपंच झाले तेंव्हापासून आज पर्यंत सर्व ग्रामस्थ निरंतर ऋषी भोजनाची व्यवस्था करत असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे.पर्जन्य यागाचे आयोजन करण्याचा मुख्य उद्देश हा लांबलेल्या पावसाचे आगमन व्हावे,शेतकरी राजा सुखी व्हावा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी हा यामागील मुख्य संकल्प होता.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पाऊस वेळेवर पडावा आणि दुष्काळाचे संकट टळावे यासाठी हिंदू धर्मात ‘पर्जन्य याग’ किंवा वरुण यज्ञ आयोजित करण्याची परंपरा आहे.वरुण देवता आणि इंद्र देवाला प्रसन्न करण्यासाठी हा एक वैदिक विधी मानला जातो.त्याला मोठी प्राचीन परंपरा आहे.पर्जन्य यागाचे आयोजन करण्याचा मुख्य उद्देश हा लांबलेल्या पावसाचे आगमन व्हावे,शेतकरी राजा सुखी व्हावा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी हा यामागील मुख्य संकल्प असतो.या यज्ञात प्रामुख्याने ऋग्वेद आणि अथर्ववेदातील पर्जन्य सूक्तांचा प्रामुख्याने जप केला जातो.वरुण,इंद्र आणि भगवान विष्णूची पूजा करून पर्जन्यासाठी आहुती दिली जाते.यावर्षी कोपरगाव आणि नजीकच्या तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे.त्यामुळे अजूनही अनेक भागात पाऊस झालेला दिसत नाही.परिणामी या पर्जन्य यज्ञाचे महत्व वाढले असल्याचे मानले जात आहे.अशातच याबाबत संवत्सर येथील ग्रामस्थानी याबाबत पुढाकार घेऊन हा उपक्रम केल्याने सर्वत्र स्वागत होत आहे.

सदर प्रसंगी सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प.पु.रमेशगिरी महाराज,आत्मा मलिक ध्यानपीठाचे गुरुवर्य,गोदावरी खोरे नामदेवराव परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,चंद्रकांत लोखंडे,लक्ष्मण परजणे,लक्ष्मण साबळे,शंकरराव भोसले,राजेंद्र भोकरे,राजेंद्र खर्डे,धिरज देवतरसे,बाळासाहेब भोसले,बाळासाहेब गायकवाड,विजय भोसले,बाळासाहेब दहे,दिलीप ढेपले,सतिश काळे,चंद्रकांत साबळे,अनिल परजणे,सहाणे टेलर,बापुराव गायकवाड,बापुराव तिरमखे,हबीब भाई,सोमनाथ घेर,पोपट बोरनारे,मारुती निरगुडे,श्री.पावडे,श्री.ढेपले,दशरथ साबळे,ह.भ.प.वाल्मीक महाराज,सुरेश लोखंडे,संदिप भोसले,नारायण आबक,प्रभाकर आबक,अरविंद आचारी,बाबासाहेब कासार,पुंगळे मामा,बंडु आचारी,किशोर ससाणे,तुषार बारहाते,रामभाऊ कासार,लहु कर्पे,तुषार बारहाते,सोमनाथ काळे,सागर काळे,अक्षय निरगुडे,संतोष निरगुडे,पांडुरंग भोसले,थोरात सर,गणेश दैने,संतोष साबळे आदीसह शृंगेश्वर भजनी मंडळ आणि बहुसंख्येने ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते.

स्व.नामदेवराव परजणे यांनी चालू केलेल्या ऋषी भोजनास सन-1995 पासून राजेश परजणे हे गावचे सरपंच झाले तेंव्हापासून आज पर्यंत सर्व ग्रामस्थ निरंतर ऋषी भोजनाची व्यवस्था करत असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे.अयोध्येत प्रभु श्रीराम चंद्राच्या जन्माच्या वेळेस पुत्र कामेष्टी यज्ञाच्या वेळी संवत्सर येथून श्री विभांडक ऋषिचे पुत्र श्री शृंगेश्वर ऋषी यांनी पौरोहित्य केल्याची कथा यावेळी रमेशगिरी महाराज यांनी विदित केली आहे.

याप्रसंगी बाबांचे पाद्यपूजन तुषार बारहाते,लहू कर्पे,रामभाऊ कासार यांनी केले,रमेशगिरी महाराज यांचा सत्कार राजेश परजणे यांनी केला आहे.तर यज्ञाचे पौरोहित्य शैलेश जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.यावेळी संवत्सर शाळेतील लहान मुलांना ऋषी स्वरूप मानून प्रत्येक मुलांचे पूजन करण्यात आले आहे.शृंगेश्वर भजनी मंडळ आणि गावातील सर्व भजनी मंडळ यांचे मोठे योगदान लाभले आहे.
दरम्यान कांदा व्यापारी शंकर भोसले यांनी विशेष सेवा दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.तर या उपक्रमासाठी विजय आगवन यांचे योगदान लाभले आहे. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश परजणे यांनी केले तर सूत्रसंचालन लक्ष्मण साबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार विवेक परजणे यांनी मानले आहे.



