जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

गोवंश हत्येचा प्रतिबंधासाठी पालिकेसह पोलिसांची कारवाई !

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
 
  कोपरगाव शहरात गोवंश हत्या हा कायम चिंतेचा विषय राहिलेला आहे.त्यामुळे पोलिस आणि नगरपरिषद प्रशासन वैतागले असताना आज नगरपरिषद प्रशासनाने कठोर निर्णय घेत पोलिस प्रशासनाला साथीला घेत आज संजयनगर परिसरात मोठी कारवाई करत त्या ठिकाणचे अतिक्रमणावर निर्दयपणे हातोडा चालवला असल्याचे दिसून आले आहे.सुमारे दोन तास चाललेल्या या कारवाईत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही हे विशेष ! याबाबत नगरपरिषद प्रशासन आणि पोलिसांचे कौतुक होत आहे.

कोपरगावात गोवंशाबद्दल सातत्याने वादग्रस्त असलेल्या संजयनगर परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई करताना नगरपरिषद यंत्रणा दिसत आहे.

दरम्यान कोपरगाव शहरात भाजप संबंधित ईशान्यगडाची सत्ता आली नगराध्यक्ष असताना अशी कारवाई गेल्या पन्नास वर्षात पहिल्यांदा झाली असल्याचे मानले जात आहे.त्याबद्दल कोपरगाव शहर आणि तालुक्यात सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.याबाबत माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सातत्याने त्यांचेवर टीका केली होती.मात्र त्याला ते कधीच दाद देताना दिसले नव्हते हे विशेष ! त्यामुळे या कारवाईचे काय पडसाद मुस्लिम मतदारांत मिटणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

   कोपरगाव शहरात सन-2017 साली विजय वहाडणे नगराध्यक्ष असताना ऐन शिवरात्रीच्या दिवशी नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गोवंश हत्या करणारी मोठी टोळी पकडली होती.त्यांचे लागेबांधे थेट संगमनेर आणि गुजरात पर्यंत आढळून आले होते.कोपरगाव शहरात गोवंश जातीच्या प्राण्याची कत्तल करायची व तो माल संगमनेर मार्फत गुजरात,मुंबई आदी ठिकाणी पाठवायचा आणि बक्कळ कमाई करायची अशी पद्धत त्यावेळी आरोपींनी अवलंबली होती.त्यामागे अर्थातच कोपरगाव शहर हे गोवंश हत्या करणाऱ्या आरोपींना सुरक्षित मानले जात होते.त्यांना राजकीय संरक्षण होते हे वेगळे सांगणे नको.त्या रक्ताचा महापूर थेट पवित्र समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीत जाऊन त्याच पाण्याने भाविकांना विविध सण आणि पर्वणीच्या काळात पवित्र स्नान करावे लागत होते.परिणामी या बातम्यांनी अहिल्यानगर जिल्हा हादरला होता.त्यावेळी श्री क्षेत्र सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी याप्रश्नी कठोर भूमिका घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती.या कारवाईत विशेष म्हणजे एका मुस्लिम पोलिस कर्मचाऱ्याने गुप्तपणे या ठिकाणी प्रवेश मिळवून जवळपास सहा ते सात दिवस राहून सर्व ठावठिकाणा मिळवला होता.त्या कारवाईत मोठी भूमिका निभावली होती हे विशेष ! त्यांचे सर्वत्र कौतुक झाले होते.त्यांनी अनेक दिवस पाळत ठेवून शहर पोलिसांना अंधारात ठेवून ही कारवाई केली होती.विशेष म्हणजे त्यावेळी राज्यात  त्यावेळीही भाजपचे सरकार होते आणि आजही आहे.या प्रकरणी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सातत्याने आवाज उठवून या प्रश्नी कारवाईची मागणी केली आहे.अलीकडील काळात बजरंग दल,गोरक्षक आदी महत्वाची भूमिका निभावत आहेत.दोन दिवसांपूर्वी अशीच कारवाई संजयनगर येथील आयेशा कॉलनी येथे झाली होती.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील संजयनगर हद्दीत अतिक्रमण विरोधी कारवाई करताना पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आणि नगरपरिषद प्रशासन.

दरम्यान कोपरगाव शहर आणि तालुक्यात एरव्ही गोवंश हत्या आणि गोवंश वाहतूक करण्यात पुढाकार घेणाऱ्या हिंदुत्ववादी संघटना,गोरक्षक आदी मंडळी या कारवाई दरम्यान या घटनास्थळी फिरकताना आढळल्या असल्याचे दिसून आले नाही.त्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

   दरम्यान त्यात पोलिस कॉन्स्टेबल यमनाजी सुबे यांनी आरोपी शफीक शरीफ कुरेशी व शाहीद शेख या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.यातील आरोपी शफीक सय्यद हा फरार झाला होता.त्यात 40 हजार किमतीचे गोवंश जप्त करण्यात आले होते.ही कारवाई पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिपक रोठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबवली होती.असा कारवायांनी या घटनांना अद्याप पर्यंत कोणताही पायबंद बसला असल्याचे दिसून आलेले नाही.परिणामी राज्य सरकारने दिनाक 21 मे 2026 रोजी एक नवा अध्यादेश काढून याबाबत पोलिसांना सक्त कारवाईचे आदेश दिले होते.त्यात त्यांनी,”प्रचलित असलेले कायदे व आणि नियम यांचा भंग करून वारंवार  संघटित पद्धतीने गो तस्करी करणाऱ्या व्यक्ती टोळ्या अथवा संघटनाविरुद्ध संबंधित पोलिस यंत्रणांनी तपास करून मोक्का अंतर्गत कारवाई करावी असे आदेश दिले आहे.त्यासाठी सरकारने या गोवंश हत्येस प्रतिबंध होण्यासाठी 112 क्रमांकाची प्रसिद्धी करून या हेल्पलाईंनवर नागरिकांनी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.त्यानंतर प्रशासन जागे झाले होते.या शिवाय हिंदुत्ववादी संघटना,बजरंग दल,गोसेवक आदींनी तातडीने दोन दिवसापूर्वी एक बैठक शहर पोलिस ठाण्यात आयोजित करून या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.त्यानंतर नगरपरिषद आणि पोलिसांनी याबाबत संबंधिताना नोटिसा बजावल्या होत्या.व कारवाई होणार हे नक्की झाले होते.आज त्याची प्रचिती आली असून सकाळी 10 वाजता कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप आणि शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आपला फौज फाटा घेऊन संजयनगर कडे रवाना झाले होते.तर नगरपरिषद प्रशासन आपले झाडून सगळे अधिकारी आणि कर्मचारी आदींना घेऊन हजर होते.दोन जेसोबी आणि ट्रॅक्टर,डंपर आदी साहित्य बरोबर होते.त्याची सुरुवात ‘आयेशा कॉलनी’च्या दक्षिण बाजूने केली होती.त्या ठिकाणचे सर्वच संशयास्पद इसमांना आधीच नोटीसा असल्याने त्यांनी हरकत न घेता काम करू दिले आहे.त्यामुळे अवघ्या दोन तासात या ठिकाणचे गोवंश हत्येतील अनेकाना त्यांचा फटका बसला आहे.त्यांचे साहित्य आणि पत्रे तत्सम साहित्य घेऊन जाण्याची मोठी तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले आहे.

  दरम्यान दोन दिवसापूर्वी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल यमनाजी सुंबे यांनी आरोपी शफीक शरीफ कुरेशी व शाहीद शेख या दोघांविरुद्ध गोवंश हत्येचा गुन्हा दाखल केला होता.यातील आरोपी शफीक सय्यद हा फरार झाला होता.त्यात 40 हजार किमतीचे गोवंश जप्त करण्यात आले होते.ही कारवाई पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिपक रोठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबवली होती.असा कारवायांनी या घटनांना अद्याप पर्यंत कोणताही पायबंद बसला असल्याचे दिसून आलेले नाही.त्यामुळे आजच्या कारवाईला महत्व प्राप्त झाले असल्याचे मानले जात आहे.

  दरम्यान या कारवाईसाठी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्यासह कोपरगाव शहर पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचेसह पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने,दिपक रोठे,शहर पोलिस ठाण्याचे सर्व पोलिस कर्मचारी आदींसह राखीव पोलिस दलाचे जवान,महिला पोलिस आदींनी निर्णायक भूमिका निभावली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोपरगाव नगरपरिषद मुख्याधिकारी सुहास जगताप.

  दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष पराग संधान यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”पालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने जी कारवाई केली आहे ती चुकीची ठरवता येणार नाही,जे चुकीचे आहे ते चुकीचे म्हटले पाहिजे.जनहितासाठी कायदे जर असतील तर त्याचे पालन सर्वांनी करणे अभिप्रेत आहे.त्याला कोणाला अपवाद ठरवता येणार नाही.

  दरम्यान कोपरगाव शहरात भाजप संबंधित ईशान्यगडाची सत्ता आली नगराध्यक्ष असताना अशी कारवाई गेल्या पन्नास वर्षात पहिल्यांदा झाली असल्याचे मानले जात आहे.त्याबद्दल कोपरगाव शहर आणि तालुक्यात सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.याबाबत माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सातत्याने त्यांचेवर टीका केली होती.मात्र त्याला ते कधीच दाद देताना दिसले नव्हते हे विशेष ! मात्र या कारवाईला दि.21 मे 2026 चा शासन आदेश असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या घटनेचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close