शैक्षणिक
…या शाळेला ‘गोल्डन स्कूल’ अवॉर्ड ने केले सन्मानीत

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
इंडियन टॅलेंट ऑलंपियाड तर्फे घेण्यात आलेल्या आॅलिम्पियाड परिक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लीश मिडीयम गुरूकूलने देशपातळीवर आपला ठसा उमटवला असून या विद्यालयाच्या तब्बल १३१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादित स्थान मिळवीत राष्ट्रीय पातळीवरील आपले स्थान यंदाही कायम ठेवले असल्याची माहिती हाती आली आहे.हि कामगीरी लक्षात घेऊन या गुरूकूल विद्यालयाला गोल्डन स्कुल आॅफ अवार्ड देऊन सन्मानीत करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य निरंजन डांगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

“आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडियम गुरुकुलाचे विद्यार्थी सर्व प्रकारच्या ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षांमध्ये केवळ राज्य पातळीवर नाही तर देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक कामगिरी करत आहेत.या माध्यमातून मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी यश संपादन करू शकतात हे आत्मा मालिक ने पून्हा एकदा सिध्द केले आहे”-नंदकुमार सुर्यवंशी,अध्यक्ष,विश्वात्मक,जंगली महाराज आश्रम ट्रस्ट.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”इंडियन टॅलेंट ऑलंपियाड तर्फे देश पातळीवर गणित,विज्ञान,इंग्रजी, कला,संगणक आणि जनरल नॉलेज या विषयांची ओलंपियाड परीक्षा घेतली जाते.या परिक्षेत गुरूकुलाच्या 131 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.त्यात 6 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत,14 विद्यार्थ्यांना एक्सलन्स अवार्ड, 38 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल 37,विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल व 36 विद्यार्थ्यांना ब्रांन्झ प्राप्त केले आहे.अभ्यासक्रमाचे सूक्ष्म नियोजन,तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,तयारीसाठी विशेष शिबिरांचेआयोजन,नैदानिक चाचण्या,सराव परीक्षा,तज्ञांचे मार्गदर्शन यामुळे हे यश प्राप्त झाले असल्याचा दावा केला आहे.
या विद्यार्थ्यांत श्लोक गंगापूरकर राज्यात चैतन्य घोडके,साई घोडके व आरव नानेकर,प्रणव बदाडे,यशवंत जाधव यांनी अनुक्रमे पहिले पाच क्रमांक पटकावले आहे.या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे विभाग प्रमुख अनिल सोनवणे,सचिन डांगे,पर्यवेक्षक नयना शेटे,गणेश रासने,इंडियन टॅलेंट कॉर्डिनेटर अमोल कर्डिले,राजेंद्र जाधव,विषय शिक्षक अनिता वाणी,रूपाली होन,अजय कांबळे,गुरुराज सज्जन,पंकज गुरसळ,अनुष्का यादव,रोहिणी होन,प्रियांषु कुमार,हरीश तेली यांचे मार्गदर्शन लाभले होते.
या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी,उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे,सरचिटणीस हनुमंत भोंगळे,कोषाध्यक्ष विठ्ठल होन,विश्वस्त प्रकाश गिरमे,प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे,मीरा पटेल यांनी अभिनंदन केले आहे.
“आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडियम गुरुकुलाचे विद्यार्थी सर्व प्रकारच्या ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षांमध्ये केवळ राज्य पातळीवर नाही तर देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक कामगिरी करत आहेत.या माध्यमातून मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आंतरराष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान यश संपादन करू शकतात हे आत्मा मालिक ने पून्हा एकदा सिध्द केले आहे” -नंदकुमार सुर्यवंशी,अध्यक्ष,विश्वात्मक,जंगली महाराज आश्रम ट्रस्ट.



