गुन्हे विषयक
किरकोळ कारणावरून एकास पिस्तुलने मारहाण,तिघांवर गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील यशवंत चौकात रहिवासी असलेला आपला भाऊ व त्याचे मित्र आइस्क्रीम घेत असताना अण्णाभाऊ साठे चौकात रात्री11.30 वाजेच्या सुमारास,”गाडी हळू चालव,मुलांना घक्का लागेल” असे म्हटल्याचा राग येऊन आपल्या पुतण्या विक्रम सागर पवार यास आरोपी हर्षल दत्तात्रय गवारे,आसिफ हसन शेख,सिद्धार्थ सर्जेराव भारती यांनी बेस बॉलच्या दांड्याने व नंतर पिस्तूल उलटा करून त्यास डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले असल्याचा गुन्हा जखमी तरुणाचा भाऊ राहुल भगवान पवार यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहर आणि तालुक्यात अवैध वाळू उपसा,गुटखा,अवैध दारू व तत्सम अवैध धंदे जोरात आहे.शहरातील मागील सहा महिन्यापूर्वी पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत जवळपास अठरा जण अवैध व्यवसायाशी संबंधित असल्याने राजकारणाचा रोख कुठे चालला आहे ही वर्तमान काळातील सर्वात चिंतेची बाब बनली आहे.परिणामी पोलिसांचा धाक राहिला नाहीच पण राजकीय आश्रय मिळणे ही मोठी गंभीर बाब मानली जात आहे.अशा घटनांत वाढ होत असताना दिसत आहे.अशीच घटना नुकतीच दि.22 मे च्या रात्री 11.30 वाजता लोकशाहीर अण्णासाहेब साठे पुतळ्याजवळ घडली आहे.त्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
कोपरगाव शहरातील गुन्हेगारी सातत्याने वाढताना दिसून येत आहे.याबाबत अनेकवेळा गोळीबार होताना दिसून येत असून पुरवठा विभागातील भ्रष्टाचार हा चिंतेचा विषय आहे.शिवाय अवैध वाळू उपसा,गुटखा,अवैध दारू व तत्सम अवैध धंदे जोरात आहे.शहरातील मागील सहा महिन्यापूर्वी पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत जवळपास अठरा जण अवैध व्यवसायाशी संबंधित असल्याने राजकारणाचा रोख कुठे चालला आहे ही वर्तमान काळातील सर्वात चिंतेची बाब बनली आहे.परिणामी पोलिसांचा धाक राहिला नाहीच पण राजकीय आश्रय मिळणे ही मोठी गंभीर बाब मानली जात आहे.अशा घटनांत वाढ होत असताना दिसत आहे.

दरम्यान अशीच घटना नुकतीच दि.22 मे च्या रात्री 11.30 वाजता लोकशाहीर अण्णासाहेब साठे पुतळ्याजवळ घडली आहे.यातील फिर्यादी राहुल पवार याचा भाऊ विक्रम पवार हा व त्याचा मित्र हे त्या ठिकाणी उभे असताना भरकादेवी आईस क्रीम मधून आईस क्रीम खाण्यास घेत असताना त्या ठिकाणी आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन हर्षल गवारे हा जोरात चालवत येऊन त्याने सदरची गाडी जखमी विक्रम पवार याचे जवळ उभी केली होती.त्यावेळी जखमी विक्रम पवार व त्याचा सहकारी यांनी त्यास,” अरे,हर्षल गाडी हळू चालव,मुलांना गाडीचा धक्का लागेल” असे म्हटल्याचा राग आला होता.त्याला ते समजावून सांगत असताना त्याने आपली गाडी थांबवून गाडीतील बेस बॉल चा दांडा बाहेर काढून जखमी तरुण विक्रम पवार यास मारहाण सुरू केली होती.त्याला त्याचे अन्य सहकारी सिद्धार्थ भारती आणि आसिफ शेख यांनीही मदत केली आहे.शेवटी तर त्याने आपल्या ताब्यातील पिस्तूल काढून त्याच्या उलट्या दांड्याने त्याच्या डोक्यात जोराचा प्रहार केल्याने त्याचे डोके फुटून तो गंभीर जखमी झाला आहे.ही माहिती स्वप्नील बाळू पवार यास समजली असतान त्याने त्याची कशीबशी सुटका केली आहे.त्याला डोक्यात मोठी गंभीर दुखापत झाली असल्याचे दिसून येत आहे,त्याला संत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

या प्रकरणी जखमी विक्रम पवार याचा भाऊ राहुल पवार याने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरुद्ध दरम्यान याबाबत कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदणी क्रं.-165/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118 (1),352,351(2),(3)(5) अन्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान पुढील तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिपक रोठे हे करीत आहेत.



