जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

…या महीलेचा नागरी सत्कार होणार !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   मुंबईतील गुलाबराव शेळके महानगर बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्रीमती गीतांजली उदय शेळके यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार विजयी झाल्याबद्दल कोपरगाव गीतांजली शेळके सत्कार समितीच्या वतीने शनिवार दि.२८ जून रोजी दुपारी ०३ वाजता छ्त्रपती संभाजी महाराज चौकात कृष्णाई बँक्वेट येथे नागरी सत्कार आयोजित केला असल्याची माहिती आयोजक व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिली आहे.

  

दरम्यान विजयी गीतांजली शेळके यांचे माहेर कोपरगाव येथील असल्याने कोपरगाव येथील सत्कार समितीने त्यांचा व त्यांच्या विजयी संचालकांचा सत्कार आयोजित केला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानंदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव हे राहणार आहे.

  मुंबई आणि परिसरात सहकारात अग्रगण्य समजली जाणारी जी.एस.महानगर बँक पंचवार्षिक निवडणूक नुकतीच एक जून रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.यावेळी बँकेच्या अध्यक्षपदी गीतांजली शेळके तर उपाध्यक्षपदी भास्करराव कवाद यांची निवड करण्यात आली आहे.या वेळी गुलाबराव शेळके संस्थापक पॅनेलचा एकहाती विजयी झाला.एक संचालक बिनविरोध;तर १८ संचालक या लढतीत विजय झाले आहेत.जवळपास ८० टक्के मते मिळवत गुलाबराव शेळके पॅनेलने सुमन गुलाबराव शेळके या पॅनेलचा पराभव केला होता.माजी अध्यक्ष उदय शेळके यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच निवडणूक लागली होती.त्यात सून विरुद्ध सासू आणि नणंद असा सामना या लढतीत पाहायला मिळाला.इतक्या वर्षांत पहिल्यांदाच चुरशीची लढत होणार असे वातावरण निवडणुकी दरम्यान पाहायला मिळाले;मात्र यात दिवंगत गुलाबराव शेळके यांच्या सून व उदय शेळके यांच्या पत्नी गीतांजली शेळके यांच्या पॅनेलने बाजी मारली आहे.

   दरम्यान विजयी गीतांजली शेळके यांचे माहेर कोपरगाव येथील असल्याने कोपरगाव येथील सत्कार समितीने त्यांचा व त्यांच्या विजयी संचालकांचा सत्कार आयोजित केला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानंदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव हे राहणार आहे.

   दरम्यान या सत्कार सोहळ्यास आ.आशुतोष काळे,संजीवनीचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,आ.सत्याजित तांबे,उद्योजक कैलास ठोळे,गोदावरी- परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,संग्राम कोते,शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माधवराव देशमुख,संग्राम देशमुख आदींनी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close