जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी…यांची निवड

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘उपाध्यक्ष’ पदी कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या गणल्या जाणाऱ्या पोहेगावातील कार्यकर्ते सचिन चांगदेव मुजगुले यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे अहिल्यानगर जिल्हात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सचिन मुजगुले यांना जिल्हाउपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देताना आ.रोहित पवार,जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे सुरेश बोळींज आणि अन्य सहकारी दिसत आहे.

सचिन मुजगुले यांनी यापूर्वी सन-2006 साली मे महिन्यात राज्यात कुक्कुट पालकांना जेरीस आणलेल्या बर्ड फ्ल्यू या रोगात बळी पडलेल्या कोंबड्यांची कुक्कुटपालकानी नगर जिल्हा संघटना स्थापन करून त्यासाठी आंदोलन पुकारून नुकसान भरपाई मिळावी म्हणून कोपरगाव येथे दीर्घकालीन आंदोलन पुकारले होते.त्या आंदोलनात सचिन मुजगुले यांनी मोठे योगदान दिले होते.

   राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक पातळीवर मागील वर्षात मे महिन्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता.त्यात पक्षाने नुकतीच पंधरा नव्या अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर केली होती.या यादीत काही प्रमुख आणि चर्चेत असलेल्या नावांचा समावेश होता तर काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती.आता अहिल्यानगर जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांची निवड जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी जाहीर केली आहे.त्यात कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील निष्ठावान कार्यकर्ते सचिन मुजगुले यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाची संधी दिली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आ.रोहित पवार यांचे समवेत सचिन मुजगुले.

   सचिन मुजगुले यांनी यापूर्वी सन-2006 साली मे महिन्यात राज्यात कुक्कुट पालकांना जेरीस आणलेल्या बर्ड फ्ल्यू या रोगात बळी पडलेल्या कोंबड्यांची कुक्कुटपालकानी नगर जिल्हा संघटना स्थापन करून त्यासाठी आंदोलन पुकारून नुकसान भरपाई मिळावी म्हणून कोपरगाव येथे दीर्घकालीन आंदोलन पुकारले होते.त्या आंदोलनात सचिन मुजगुले यांनी मोठे योगदान दिले होते.हे आंदोलन पुढे राज्यभर पसरले होते.परिणामी तत्कालीन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री हसन मुश्रीप यांना प्रत्येक पक्षांमागे वीस रुपयांची भरपाई द्यावी लागली होती.तर पाच वर्षाचे थकलेले कुक्कुट पालकांचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान द्यावे लागले होते.त्यामुळे राज्यातील कुक्कुट पालकांना जवळपास 250 कोटींचा फायदा झाला होता.याखेरीज त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध आंदोलनात सहभाग घेऊन शेतकऱ्यांना न्याय दिला आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना ही पद दिले असल्याचे मानले जात आहे.

    दरम्यान त्यांच्या नियुक्तीबद्दल जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी म्हटलं आहे की,”आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांचे पुरोगामी विचार व पक्षाचे ध्येय धोरणे समाजात रुजवून पक्ष संघटना मजबूत करावी.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे,कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे,आ.रोहित पवार व खा.निलेश लंके यांचे मार्गदर्शनानुसार सर्व सामान्य जनतेच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे.आपण राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अनुभवी आहात,आपल्या कौशल्याचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढविण्यासाठी निश्चितच होईल असा विश्वास शेवटी जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close