जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

…यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यपदी निवड !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर’च्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्याने कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सुधीर डागा.

  “सुधीर डागा यांच्या निवडीमुळे कोपरगावसारख्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची एकजूट करून जिल्ह्याचे नाव राज्यभर उंचावावे.तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र मानगावे यांचा तालुका व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात येणार आहे”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ.

  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड जाहीर झाली आहे.त्यात अध्यक्षपदी सांगलीचे उद्योजक रवींद्र मानगावे तर उपाध्यक्षपदी महेंद्र अग्रवाल (धुळे) आणि वरिष्ठ उपाध्यक्षपदी कमलाकर शेट्टी यांची निवड झाली आहे.

“सुमारे चाळीस वर्षांपूर्वी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समध्ये गव्हर्निंग कौन्सिल सदस्य पदी निवड झाली होती.त्यांनी या पदावर कार्यरत राहून कोपरगावच्या व्यापारी वर्गाचे प्रतिनिधित्व केले होते.त्यानंतर कोपरगाव शहरातील व्यक्तीस या संस्थेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

  सुधीर डागा यांनी गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ व्यापार,ग्राहक हित आणि व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केले आहे.त्यांनी मांडलेली ‘वन रेट,वन वेट,वन नेशन’ ही संकल्पना राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने त्यांना सदस्यपदाची संधी दिली असून ही त्यांच्या कार्याची पावती असल्याचे बोलले जात आहे.

  त्यांच्या निवडीचे राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष अजित लोहाडे,तुलसीदास खुबानी,कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमारजी बंब,कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे सचिव प्रदीप साखरे आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close