जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

कोपरगावातील जनतेला वाली उरला नाही

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.या विपरीत स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण राज्यासह कोपरगाव विधानसभा मतदार संघात,”माझे कुटुंब,माझी जबाबदारी” मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे मात्र तोपर्यंत तालुक्यात कोरोना तपासणी संच,प्राणवायू,व्हेंटिलेटरची कमतरता तत्सम साहित्याचा अभाव,कोरोना लसीचा अभाव,नसल्याने कोठे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे.

शिर्डी येथील पोलीस अधिकारी कोपरगाव शहरात येऊन औषधालयांवर येऊन दिवसाढवळ्या धाडी टाकतात याची माहिती दिली जात नाही.या बाबत जनतेत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.यात मोठी आर्थिक घडामोड झाल्याचे नागरिक सर्रास बोलत आहेत.यावरही नेते आणि वरिष्ठ अधिकारी काही बोध घेणार आहे की नाही ? दुसरीकडे शहर व तालुक्यात जनतेत कोरोनाची भीती दिसत नाही.कोणीही मुखपट्या बांधताना दिसत नाही.त्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करताना सरकारी अधिकारी,पालिका प्रशासन दिसत नाही.काही वैद्यकीय अधिकारी सरकारी सेवेत कमी व खाजगी सेवेत जास्त दिसत असून ते थोडीफार सेवा देत असतील तर त्याची दखल जनता घेताना दिसत नाही.सारेच चित्र चिंताजनक आहे.

राज्यात एकूण ३६ लाख ९८ हजार ३५४ सक्रिय रुग्ण आहेत.कोपरगावातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असताना तालुक्यात आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर रुग्ण बळी गेले आहे.याबाबत आरोग्य विभाग आता आकडेवारी लपवू लागला असल्याचे दिसत आहे.दररोज प्रसिद्ध होणारी आकडेवारी व त्याची एकत्रित बेरीज आता प्रसिद्धीस देण्याचे तालुका प्रशासनाकडून जबाबदारी टाळली जात आहे.तालुक्यात कोरोना तपासणी संचाची,प्राणवायूची मोठी कमतरता जाणवत असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.किंवा हि साधने मिळविण्यात अपयश तरी येत आहे.त्यामुळे तालुक्याचे खरे चित्र स्पष्ट होण्यास मोठा प्रमाणावर अडथळे निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर हि रुग्णवाहिका देण्यात आली आहे.वर्तमानात रुग्णांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाला कोरोना तपासणी संचाची व कोरोना लसीची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत आहे.हि बाब कौतुकास्पद असली तरी ती संकटसमयी कवडसा ठरण्याची शक्यता आहे.रेमडीसीविर या इंजेक्शनची काळाबाजार हि तर देशपातळीवर डोकेदुखी आहे यात शंका नाही मात्र काही लोकप्रतिनिधींचे वागणे बालिश पणाला लाजवील अशी आहे.यात पंतप्रधानांनी लक्ष घातले आहे.हि समाधानाची बाब असली तरी एवढ्यात सगळे काही सरळ होईल असा भाबडा समज कोणी करून घेण्यात काही हशील नाही.या खेरीज आरोग्य विभागाला दुसरीकडे खाजगी रुग्णालये वैद्यकीय बिले आकारताना सरकारी दराचा मुळीच मुलाहिजा बाळगताना दिसत नाही अनेकवेळा नागरिक,रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही हि बाब गंभीर आहे.धाडी टाकल्या तरी त्या बाबत सविस्तर माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली जात नाही.खाटा अमी पडणार अशी अटकळ नेत्याना बांधता आली नाही हे मोठे आश्चर्य आहे.त्याबाबत सामाजिक संकेतस्थळावर नेटकऱ्यांनी तालुक्यातील नेत्यांना झोडपण्यास प्रारंभ केल्यावर काहींनी अंग झटकल्याचे चांगले नाटक वठवले व मग कोविड केंद्रे सुरु करण्याची त्यांना सदबुद्धी झाली.काहींनी किरकोळ गोष्टी देऊन गजर गाड्याचा… करण्याचा सपाटा लावला आहे.येणाऱ्या बातम्या तर शिसारी येणाऱ्या आहेत.जनतेवर मोठा उपकार करत असल्याची या नेत्यांची भावना काही केल्या लपून राहत नाही.सामाजिक संस्थांचे जनसामान्याबाबत प्रेम आटले की काय अशी स्थिती आहे.नाही म्हणायला काही संस्था आजही ते काम इमानेइतबारे करताना दिसत आहे.मात्र त्यांची संख्या अगदी नगण्य म्हणजे एका हाताची बोटे जास्त म्हणावी अशी आहेत.त्यांची अवस्था,”रोज मरे,त्याला कोण रडे” अशी झाली असल्यास नवल नाही कोरोना वर्ष उलटूनही अद्याप संपायचे नाव घेत नाही.कधी संपणार याची अद्याप तरी चिन्हे दिसत नाही.तसे लसीवर मात करणारे देश म्हणून इंग्लड,इस्रायल आदींनी लक्षवेधी यश मिळवले आहे.त्यामुळे तो दिवस दूर नाही अशी आशा बाळगायला हरकत नाही असो..

आता याच संबंधित मुद्याचा विचार करताना हि बाबत नक्कीच लक्षवेधी ठरावी अशी वाटत आहे ती म्हणजे वर्तमान पत्रकारिता आणि बातमीदारी.ती आता केवळ पोष्ट मास्तरचे टपाल पुढे सरकविण्यासारखी उरली आहे.त्यात सामाजिक संकेतस्थळावरील बातम्या बाबत तर विचारायलाच नको.नको त्या भूसकटाचा मारा सुरु आहे.वर्तमान नेत्यानीं व सहकारी कारखानदारांनी आपल्या आरत्या,पोवाडे गाऊन घ्यायला पढीक पंडितांच्या फौजा आपल्या पदरी बाळगल्या आहेत.त्यामुळे ताटात नको त्या पदार्थाचा मारा झाल्यावर जशी ती बाब खाणाराच्या शिसारी येते तद्वतच हि नको असलेली प्रसिद्धी जनतेच्या शिसारी आली आहे.एरव्ही निवडणूक असल्या तर याच नेत्यांना झोपा येत नाही मतदारांच्या उंबऱ्याला माती कमी करून टाकायला हि मंडळी कमी करत नाही.मात्र संकटकाळी काय करायचे याची जनतेतून सूचनांची वाट पाहण्या इथपर्यंत यांचा अडाणीपणा नक्कीच जनतेच्या डोळ्यात ठसठशीत भरणारा आहे हे विसरता येणार नाही.

शिर्डी येथील पोलीस अधिकारी कोपरगाव शहरात येऊन औषधालयांवर येऊन दिवसाढवळ्या धाडी टाकतात याची माहिती दिली जात नाही.या बाबत जनतेत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.यात मोठी आर्थिक घडामोड झाल्याचे नागरिक सर्रास बोलत आहेत.यावरही नेते आणि वरिष्ठ अधिकारी काही बोध घेणार आहे की नाही ? तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी मृत्यूची आकडेवारी सांगण्याची तसदी घ्यायचे सोडून दिले आहे.त्यामुळे आपल्याकडे लोकशाही असूनही बंदिस्त चीनला नाव ठेंवण्याचा आपल्याला काय अधिकार उरतो ? हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.दुसरीकडे शहर व तालुक्यात जनतेत कोरोनाची भीती दिसत नाही.कोणीही मुखपट्या बांधताना दिसत नाही.त्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करताना सरकारी अधिकारी,पालिका प्रशासन दिसत नाही.थोडीफार देत असतील तर त्याची दखल जनता घेताना दिसत नाही.सकाळी आठ ते अकरा हि अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी वेळ ठरवून दिली आहे.मात्र त्यावेळी नागरिक मोठ्या प्रमाणावर व अनावश्यक गर्दी करताना दिसत आहे.त्यानां पोलिसांचा धाक वाटत नाही.एखादी जत्रा कमी वाटावी अशी शहराची स्थिती झाली आहे.गत वर्षी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी शिस्तीवर कोरोना बऱ्यापैकी नियंत्रित ठेवला होता.हि बाब येथे लक्षणीय ठरावी.याला कोणीही नाकारणार नाही.आता कर्तव्य कठोर अधिकारी शोधून सापडणे अवघड बनले आहे अशी स्थिती आहे.मात्र आता पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.पोलिसांनी आपल्या हातातील काठीचा उपयोग या कठीण समयी करावा अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे.त्याकडे राजकीय सोय राजकीय नेत्यांनी आपली सोय पाहू नये हे उत्तम.राजकीय कार्यकर्ते व नेते यांच्यावरही शिस्तीबाबत पोलिसांचा धाक असेल तर कोरोना नियंत्रणात येण्याची शक्यता वाढते हा कोपरंगावकरांना जुना अनुभव आहे.याची पुनरावृत्ती होणे गरजेचे आहे.वर्तमानात जनतेला आज वाली उरला नाही असेच सार्वत्रिक चित्र आज तरी आहे.तेंव्हा जनेतेनेच पुढाकार घेऊन आपली काळजी घेणे इष्ट.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close