कृषी विभाग

फळे पिकविण्यासाठी कोपरगावात आता नवीन संशोधन !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

विविध फळ हंगामात फळे पिकवताना रासायनिक पदार्थांचा वापर करणे घातक असून त्याचे मनुष्य जीवनावर दुष्परिणाम होत असल्याने त्यावर संशोधन करून नागरिकांना या घातक पदार्थापासून वाचविण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील कृषी तज्ञ सतीश नेने यांनी नवीन फळे पिकविण्याचे विशेष चूर्ण शोधले असून त्याबाबत त्यांनी पेटंट मिळवले असल्याचा दावा एका पत्रकार परिषदेत केला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

“फळ पिकविण्यासाठी विविध पावडरींच्या वापराच्या रासायनिक प्रक्रियेमुळे किडनी व यकृतावर परिणाम होतो.अशा प्रक्रिया केलेल्या आंब्यांचे सेवन केल्यास किडनी व फुप्फुसाचे आजार निर्माण होतात.तसेच जुलाब होण्याची शक्यताही असते.वर्तमानात याच पावडरीचा सर्रास वापर होऊन नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे.त्यावर मात करण्यासाठी येथील शेती तज्ज्ञ सतीश नेने यांनी एक आयुर्वेदिक (हर्बल) “डिप-एन राईप” हि पावडर दहा वनस्पती पासून तयार केली आहे.या पावडरीमुळे नैसर्गिक रित्या हि फळे पिकत असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही”-सतीष नेने,कृषी तज्ज्ञ,कोपरगाव.

मार्च महिन्याची चाहूल लागताच बाजारात दिसणारा पिवळाधमक आंबा लक्ष वेधून घेतो,परंतु तो कृत्रीमरित्या पक्व करण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जात आहे.अशा द्रव्यांच्या वापरामुळे फळांना पिवळाधमक रंग आणि तकाकी येत असतली तरी त्याचे मानवी आरोग्यावर भयंकर परिणाम होत आहेत.व्यापारी आणि विक्रेत्यांकडून केवळ हव्यासापोठी होत असलेले असे प्रकार मानवाच्या प्रकृतीसाठी अत्यंत घातक आहे.तरी व्यापारी धोका पत्करून केवळ आर्थिक फायद्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळत असताना वारंवार दिसून येत आहे.

“पशु पालकांसाठी एक नवी ‘अन्नपूर्णा’ (ऍनिमल फिड सप्लिमेंटरी) पावडर शोधली असून ती तब्बल २६ वनस्पती पासून बनवली आहे.ती जनावरांना खाण्यास अपायकारक नसल्याचा दावा केला आहे.ती गाय,म्हैस,शेळी,मासे,कोंबड्या,कुत्रे,घोडे आदींना वापरल्यास त्यांना खनिजे,जीवनसत्त्वे,कॅल्शियमची कमी पडणार नाही.जवणावरांना नियमित गर्भधारणा रहाते त्वचा रोग होत नाही असा दावा केला आहे.

वर्षभर सहजपणे उपलब्ध होणारी केळी आणि हंगामात हापूस आंब्यासाठी ग्राहकांकडून चांगली मागणी असते.हापूसच्या हंगामाला आता कुठे सुरुवात झाली आहे.कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत कोकण,आंध्र प्रदेश,कर्नाटक आणि गुजरातमधून आंब्याची आवक होते.मात्र नैसर्गिकरित्या आंबा पक्व न करता कमी कालावधीत अधिक नफा मिळवण्यासाठी आंबा पाडाला येण्यापूर्वीच कृत्रिमरित्या पिकविला जातो.त्यासाठी,’कॅल्शियम कार्बाइड’चा वापर केला जातो.यामुळे,’अॅसिटीलिन गॅस’ तयार होऊन फळाला चांगला रंग येतो.मात्र यामुळे तयार झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे किडनी व यकृतावर परिणाम होतो.
अशा प्रक्रिया केलेल्या आंब्यांचे सेवन केल्यास किडनी व फुप्फुसाचे आजार निर्माण होतात.तसेच जुलाब होण्याची शक्यताही असते.वर्तमानात याच पावडरीचा सर्रास वापर होऊन नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे.त्यावर मात करण्यासाठी येथील शेती तज्ज्ञ सतीश नेने यांनी एक आयुर्वेदिक (हर्बल) “डिप-एन राईप” हि पावडर दहा वनस्पती पासून तयार केली आहे.या पावडरीमुळे नैसर्गिक रित्या हि फळे पिकत असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही असा त्यांनी दावा केला आहे.या पावडरी पासून फळांचा नगण्य नाश होतो.हे चूर्ण आंबा,केळी,पपईची वापरले जाऊ शकते.या पासून कोणताही शारीरिक व्याधींचा धोका नाही असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.
दरम्यान त्यांनी पशु पालकांसाठी एक नवी ‘अन्नपूर्णा’ (ऍनिमल फिड सप्लिमेंटरी) पावडर शोधली असून ती तब्बल २६ वनस्पती पासून बनवली आहे.ती जनावरांना खाण्यास अपायकारक नसल्याचा दावा केला आहे.ती गाय,म्हैस,शेळी,मासे,कोंबड्या,कुत्रे,घोडे आदींना वापरल्यास त्यांना खनिजे,जीवनसत्त्वे,कॅल्शियमची कमी पडणार नाही.जवणावरांना नियमित गर्भधारणा रहाते त्वचा रोग होत नाही.रक्ताभिसरण उत्तम रहाते,प्रतिकार शक्ती वाढते. असा दावा केला आहे.विष्ठेची प्रत वाढते.पिकांना आवश्यक असणाऱ्या सुक्ष्म जीवांची संख्या वाढते असे विईविध फायदे असल्याचे दावे केले आहे.जनावरे पान्हा सोडतात.व दुध उत्पादनात सरासरी १५-१८ टक्के वाढ होते असा दावा सतिष नेने यांनी केलेला असून शेतकऱ्यांनी या दोन्ही चूर्णाचा सविस्तर चर्चा करून वापर करावा असे आवाहन शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close