निधन वार्ता
बाबासाहेब थोरात यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील महावितरण कंपनीचे सेवानिवृत्त तारतंत्री बाबासाहेब यशवंत थोरात (वय-७०) यांचें नूकतेच दीर्घ आजारामुळे निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात तीन भाऊ,पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांनी प्रतिकूल काळात आपल्या कुटुंबाला आधार देण्याचे काम केले होते.त्यांच्यावर जवळके ग्रामपंचायतीच्या अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात सुरक्षित अंतर राखून आप्तस्वकीयांनी अंत्यसंस्कार केले आहे.ते जवळके ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुभाष थोरात यांचे जेष्ठ बंधू व ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या विमलताई थोरात यांचे पती होते.त्यांच्या जवळके येथील जनमंगल ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून जवळके परिसराच्या जडणघडणीत मोठा वाटा होता.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे