जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात उसाची चोरी,सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील निकम वस्ती येथील रहिवासी असलेल्या आरोपी रमेश दिनकर निकम,विलास दिनकर निकम,प्रमोद विलास निकम,अजय रमेश निकम,शैलेश रमेश निकम,दिनकर बच्चन निकम आदींनी आपल्या शेतातील उभा ऊसाबरोबर,नळ बारे,कॉक,पाईप आदी ०२ हजार ५०० रुपयांचे साहित्य आपल्या परवानगी विना तोडून नेला असल्याचा गुन्हा मोतीराम दिनकर निकम (वय-४१) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान यातील फिर्यादी हा सरकारी कामात मदत करत असल्याचा राग धरून काही वाळूचोर त्यांस वारंवार त्रास देत असून त्यातून त्यांनी घरात आपापसात हा वाद वाढून त्रास देण्याचे काम सुरु असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यात कुटुंब प्रमुख कुटुंबकर्त्याची महत्वाची जबाबदारी पार पाडत नसल्याने हा वाद वारंवार विकोपाला गेला असल्याची माहिती जबाबदार सूत्रांनी दिली आहे.यातील फिर्यादीच्या व त्याच्या कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी मोतीराम निकम व आरोपी रमेश दिनकर निकम हे भाऊ भाऊ आहेत.त्याचे काही वर्षांपासून किरकोळ कारणावरून सातत्याने वाद सुरु आहे.ते संपण्याची चिन्हे दिसत नाही यातील एक आरोपी हा शिक्षक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.मात्र तरीही हा वाद शमण्याची चिन्हे नाही.यातूनच एक घटना दि.२३ सप्टेंबर रात्री ०८ वाजता व २९ सप्टेंबरच्या दुपारी ०१ वाजेच्या सुमारास घडली आहे.

त्यात फिर्यादीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”शेतातील ०२ हजार ५०० रुपये किमतीच्या शेतातील उभा ऊसाबरोबर,नळ बारे,कॉक,पाईप आदी ०२ हजार ५०० रुपयांचे साहित्य आपल्या परवानगी विना लबाडीच्या इराद्याने स्वतःचे फायद्यासाठी नेले असल्याचा गुन्हा मोतीराम दिनकर निकम (वय-४१) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यासह पोलीस नाईक व्ही.एन.कोकाटे यांनी भेट दिली आहे.

दरम्यान यातील फिर्यादी हा सरकारी कामात मदत करत असल्याचा राग धरून काही वाळूचोर त्यांस वारंवार त्रास देत असून त्यातून त्यांनी घरात आपापसात हा वाद वाढून त्रास देण्याचे काम सुरु असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यात कुटुंब प्रमुख कुटुंबकर्त्याची महत्वाची जबाबदारी पार पाडत नसल्याने हा वाद वारंवार विकोपाला गेला असल्याची माहिती जबाबदार सूत्रांनी दिली आहे.यातील फिर्यादीच्या व त्याच्या कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.यात काही विपरीत घडण्याआधी पोलिसांनी लक्ष घालणे गरजेचे असल्याचे गावातील जेष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.या बाबत वरिष्ठ पातळीवरही तक्रारी झालेल्या आहेत.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३५१/२०१ भा.द.वि.कलम ३७९,३४ प्रमाणे सहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कोकाटे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close