कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात पावसाचे दोन बळी,भोजडेत ट्रक गेला वाहून,कर्मवीरनगर पाण्यात
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज खरा ठरला असून काल रात्री अकरा वाजे अंतर ते दोन वाजे नंतर कोपरगाव शहरात मुसळधार पाऊस कोसळला असून त्याची नोंद तीन तासात ४२ मी.मी.नोंदवली गेली आहे.तर आज मुर्शतपुर शिवारात पडलेल्या पावसाने वडील संजय मारुती मोरे (वय-३५) व सचिन संजय मोरे (वय-१४) हा मुलगा वाहून गेला असून त्यात त्यांचे निधन झाले आहे.दरम्यान त्यास वाचवताना वडीलांना आपला प्राण गंमवावा लागला असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे.तर अन्य दोन जण शुभम योगेश पवार (वय-१२) व ओम दत्तू मोरे (वय-११) या दोघांना वाचविण्यात यश आले आहे.तर भोजडे येथे एक ट्रक कोळ नदीवरून वाहून गेला आहे त्यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही.शहरात या पावसाने कर्मवीरनगर परिसरात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी गेल्याने अनेक नागरिकांना संकटांचा सामना करावा लागला आहे.
दरम्यान कोपरगाव मंडलात सर्वाधिक ४२ मी.मी.पाऊस तर सुरेगाव मंडळात १२,पोहेगाव मंडळात ३१,रावंदे येथे २२,दहिगाव बोलका परिसरात ३३ मी.मी.पासून कोसळला आहे.यामुळे बापलेकाचे दोघांचे बळी गेले असून भोजडेत ट्रक वाहून गेला आहे तर दहिगाव बोलका परिसरात संजीवानीचे माजी संचालक डॉ.गुलाबराव वरकड यांचे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाले असून काढणीस आलेला ऊस खाली पडला आहे.त्यामुळे आगामी काळात मोठे नुकसान होऊ शकते.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,हवामान खात्याने आगामी चार ते पाच दिवसांत कोकण,मध्य महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र,मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.लातूर,उस्मानाबाद,सोलापूर, कोल्हापूर,पुणे,रायगड जिल्ह्यात पुढच्या २ ते ३ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे.नागरिकांनी घरातच थांबावं असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.राज्याच्या विविध भागात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.केरळ,तमिळनाडू किनारपट्टीपासून लक्षद्वीप बेटापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे.यामुळे ८ ऑक्टोबरपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.मराठवाड्यात मेघगर्जनेसह तर विदर्भातही पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवण्यात आला आहे.तो कोपरगाव शहरात व तालुक्यात खरा ठरला आहे.त्यात तालुक्यात धारणगाव रोडवर मुर्शतपुर येथील मंडपी नाल्यावरील पूल ओलांडताना आज दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडण्याच्या नादात चार जनांपैकी दोन जण वाहून गेले असून त्यात तरुण संजय मारुती मोरे (वय-३५) व सचिन संजय मोरे (वय-१४) हा मुलगा वाहून गेला असून त्यात त्यांचे निधन झाले आहे.दरम्यान त्यास वाचवताना वडीलांना आपला प्राण गंमवावा लागला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.तर अन्य दोन जण शुभम योगेश पवार (वय-१२) व ओम दत्तू मोरे (वय-११) यादोघांना वाचविण्यात यश आले आहे.घटनास्थळी कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे व पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव यांनी भेट दिली आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील कोळ नदीवरील पुलावर पावसाचे जास्त पाणी वहात असताना एका ट्रक चालकाने आपले वाहन घातल्याने ते पुरात वाहून गेले आहे मात्र थोड्या अंतरावर अडकले असून यात सुदैवाने चालक वाहक यांची जीवित हानी मात्र झाली नाही.
कोपरगावात रात्री अकरा वाजता सुरु झालेल्या पावसाने टप्याटप्याने शहरातील रस्ते धुऊन काढले असून कोपरगाव शहरातील खंदक नाल्या शेजारी सखल भागात असलेल्या कर्मवीर नगर येथे पावसाच्या पाण्याने तळ्याचे स्वरूप आले आहे.त्यामुळे अनेक नागरिकांचा रस्ता बंद झाला आहे.तर काहींचे सामानाचे नुकसान झाले असल्याचे नागरिकांनी म्हटलें आहे.
दरम्यान कोपरगाव मंडलात सर्वाधिक ४२ मी.मी.पाऊस तर सुरेगाव मंडळात १२,पोहेगाव मंडळात ३१,रावंदे येथे २२,दहिगाव बोलका परिसरात ३३ मी.मी.पासून कोसळला आहे.मात्र दहिगाव बोलका परिसरात डॉ.गुलाबराव वरकड यांचे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाले असून काढणीस आलेला ऊस खाली पडला आहे.त्यामुळे आगामी काळात मोठे नुकसान होऊ शकते.