निवडणूक
…हा नेता उद्या कोपरगावात करणार प्रचार !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराग संधान व त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रचारासाठी उद्या दुपारी 04 वाजेच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत असून त्यासाठी भाजप कोल्हे गटाने मोठी जय्यद तयारी केली असल्याची माहिती हाती आली आहे.

ज्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य भाजप उभे करण्यासाठी घालवले त्यांना साखर आणि मद्य सम्राटांच्या प्रेमात पडून आज दुर्लक्षित करणेत येत आहे.ही मोठी शोकांतिका असल्याचे दिसून येत आहे.त्यातून भाजप अन्य आगामी कार्यकर्त्यांना कोणता संदेश देत आहे असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.भाजपच असा वागत नाही तर शिवसेना (उबाठा) हा पक्षही त्यात मागे नाही.
कोपरगाव नगरपरिषदेत दिवसेंदिवस रंगत वाढत चालली असून नगर परिषद निवडणुकीत आ.काळे गटाचे उमेदवार अपात्र करणेसाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात कोल्हे गटाने धाव घेतली होती.त्याबाबत आज दिवसभर सुनावणी संपन्न झाली असून उद्या सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्याबाबत निकाल हाती आला असून शहरात आपल्या पक्षाच्या उमेदवारांना अनुकूल वातावरण निर्माण करणेसाठी सर्व प्रथम राष्ट्रवादीने आपले प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे व महिला नेत्या रुपाली चाकणकर यांना दोन दिवसापूर्वी पाचारण केले होते.आता याबाबत भाजपचे माजी आ.कोल्हे गटाने उचल खाल्ली असून त्यांनी त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाचारण केले असून त्यांची हजेरी त्यांच्या उमेदवाराला किती मताधिक्य मिळवून देणार की मागील सन-2016 नोव्हेंबर मध्ये संपन्न झालेल्या निवडणुकीत सर्वात निचांकी मते मिळवणार. याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
मागील वेळी अपक्ष असलेल्या भाजपचे निष्ठावान उमेदवार विजय वहाडणे यांनी त्यांचे समोर मोठे आव्हान निर्माण केले होते.एव्हढेच नव्हे तर राज्यात उच्चांकी मते मिळवली होती.शेवटी तर भाजपला आपल्या पांचजन्य मासिकात वहाडणे हे आमचे उमेदवार होते अशी घोषणा नाक घासून करावी लागली होती.राज्यात सर्वाधिक मते मिळवूनही भाजपने त्यांची यावेळीही उपेक्षा केली आहे.ज्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य भाजप उभे करण्यासाठी घालवले त्यांना साखर आणि मद्य सम्राटांच्या प्रेमात पडून आज दुर्लक्षित करणेत येत आहे.ही मोठी शोकांतिका असल्याचे दिसून येत आहे.त्यातून भाजप अन्य आगामी कार्यकर्त्यांना कोणता संदेश देत आहे असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.भाजपच असा वागत नाही तर शिवसेना (उबाठा) हा पक्षही त्यात मागे नाही.त्यांनीही आपल्या निष्ठावान सहकाऱ्यांना वाळीत टाकले आहे.त्यांची कवडीमोल किंमत केली आहे.त्यामुळे आगामी काळात चापुलसी करणाऱ्या,बॅनरबाज असलेल्या आणि व्हॉट्सअप विद्यापीठात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना चांगली किंमत मिळणार असे चुकिचे संकेत मिळत आहे.त्यामुळे निष्ठावान असलेल्या कार्यकर्त्यांची फळी संपल्यात जमा झाली आहे.त्यामुळे आगामी काळात आपली तत्वे आणि त्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्यांना काहीच किंमत नाही हे उघड होत असून हे लोकशाहीसाठी मोठे घातक कृत्य ठरणार असल्याचे उघडपणे दिसून येत आहे.



