विशेष दिन
…या संस्थेत महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण विकासात महत्वाचे योगदान देणाऱ्या कोपरगाव पंचायत समितीत महाराष्ट्र दिन नुकताच शहिद सुनील रावसाहेब वलटे यांच्या पत्नी मंगलाताई वलटे यांचे हस्ते तर गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

दि.१ मे १९६० रोजी बॉम्बे राज्याचे विभाजन होऊन मराठी भाषिकांचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापन झाले,याच्या स्मरणार्थ दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.या दिवशी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते.

मुंबईसह महाराष्ट्र राज्यासाठी ज्या १०६ जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली,त्यांना या दिवशी विशेष अभिवादन केले जाते.कोपरगाव पंचायत समिती कार्यालयात हा महाराष्ट्र दिन नुकताच मोठ्या उत्साहात शहिद सुनील रावसाहेब वलटे यांच्या पत्नी मंगलाताई वलटे यांचे हस्ते तर गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे उपअभियंता तोष दळवी,गटशिक्षण अधिकारी कोपरे,बालविकास प्रकल्प अधिकारी रुपाली धुमाळ,विस्तार अधिकारी बबन वाघमोडे,बाळासाहेब साबळे,शिक्षण विस्तार अधिकारी शबाना शेख,प्रशांत वाघमारे,लेखा अधिकारी गणेश सोनवणे तसेच सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते.



