विविध पक्ष आणि संघटना
प्रहार देवळाली प्रवरा शहर उपाध्यक्षपदी…यांची निवड..

न्यूजसेवा
देवळाली प्रवरा-(प्रतिनिधी)
प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळाली प्रवरा शहर उपाध्यक्षपदी देवळाली प्रवरा येथील अशोक बाबासाहेब देशमुख यांची एक मताने निवड करण्यात आली आहे.नूतन उपाध्यक्ष यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
देवळाली प्रवरा येथील प्रहार कार्यालयात प्रहारचे शहर अध्यक्ष किरण पंडीत यांचे हस्ते देशमुख यांना निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
सदर प्रसंगी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आप्पासाहेब ढूस,प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे,प्रहार श्रमिक सेवा संघाचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष नवनाथ चव्हाण,प्रहारचे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष किरण पंडित,प्रहार दीव्यांग संघटनेचे शहर अध्यक्ष सलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.