आरोग्य
रुग्णवाहिका जीवनदायी वाहन-…यांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
देशात दर वर्षी दीड लाख मृत्यू अपघातामुळे होतात.त्यात तरुणाचा भरणा अधिक असतो.अशा वेळी रुग्णवाहिका या जीवनदायिनी वाहनाचे महत्व अधोरेखित होत असल्याचे प्रतिपादन संजीवनी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“रुग्णवाहिकेचे महत्त्व हे अपघात,हृदयविकाराचा झटका,श्वास घेण्यास त्रास किंवा गंभीर आजार अशा परिस्थितीत रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहोचते.चालत्या वाहनात उपचार: रुग्णवाहिकेत ऑक्सिजन,व्हेंटिलेटर,कार्डियाक मॉनिटर आणि आपत्कालीन औषधे असतात,ज्यामुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत स्थिरता मिळते.त्यामुळे शेकडो वर्षापासून रुग्णवाहिकेचे महत्व अबाधित आहे”-बिपीन कोल्हे,अध्यक्ष,संजीवनी कारखाना.
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील कार्यकर्ते विनोद अहिरे यांनी त्यांचे वडील स्व.मारूती अहिरे यांच्या स्मरणार्थ धारी येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्टला अद्यावत रूग्णवाहिका भेट दिली त्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला आहे.

देशात दर वर्षी दीड लाख मृत्यू अपघातामुळे होतात.त्यात तरुणाचा भरणा अधिक असतो.अशा वेळी रुग्णवाहिका या वाहनाचे महत्व अधोरेखित होते.रुग्णवाहिका ही आणीबाणीच्या वेळी रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सुविधा आणि हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणारी जीवनवाहिनी मानली जाते.हे सुसज्ज वाहन चालत्या अवस्थेत प्रथमोपचार,ऑक्सिजन आणि हृदयविकाराचे उपचार पुरवते,ज्यामुळे ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णाचा जीव वाचण्यास मदत होते.भारतात १०८ क्रमांकावर ही सेवा २४/७ उपलब्ध असते.रुग्णवाहिकेचे महत्त्व हे अपघात,हृदयविकाराचा झटका,श्वास घेण्यास त्रास किंवा गंभीर आजार अशा परिस्थितीत रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहोचते.चालत्या वाहनात उपचार: रुग्णवाहिकेत ऑक्सिजन,व्हेंटिलेटर,कार्डियाक मॉनिटर आणि आपत्कालीन औषधे असतात,ज्यामुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत स्थिरता मिळते.त्यामुळे शेकडो वर्षापासून रुग्णवाहिकेचे महत्व अबाधित आहे.त्यामुळेच कोपरगाव तालुक्यातील धानोरी येथील कार्यकर्ते विनोद अहिरे यांनी आपले वडील स्व.मारुती अहिरे यांचे स्मरणार्थ रुग्णवाहिका धानोरी येथील भैरवनाथ ट्रस्ट साठी भेट दिली आहे.त्यावेळी ते बोलत होते.
त्यावेळी पुढें बोलताना म्हणाले की,”समाजाचं आपण देणं लागत असतो.रूग्णसेवा हिच इश्वर सेवा आहे.कोरोना महामारीत आपण सर्वांनी अनुभवलं.रूग्णांना तात्काळ आरोग्यसुविधा मिळाव्या यासाठी रूग्णवाहिकेची नेहमीच गरज भासते.विनोद अहिरे यांनी नेमकेपणांने ग्रामिण भागात ही सुविधा उपलब्ध करून देत समाजाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे.माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संपुर्ण कोपरगांव विधानसभा मतदार संघात संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने फिरता दवाखाना मोबाईल व्हॅन थेट रूग्णांच्या दारापर्यंत उपलब्ध करून देत त्यातुन समाजकार्य साधण्याचा प्रयत्न केला आहे असेही कोल्हे शेवटी म्हणाले.
सदर प्रसंगी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी प्रास्तविक केले तर शेवटी संचालक विलास माळी यांनी उपस्थियांचे आभार मानले आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



