जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पाच नंबर साठवण तलावासाठी निधी द्याआ. आशुतोष काळेंची पालकमंत्र्यांकडे मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावांची साठवण क्षमता कमी असल्यामुळे शहरातील नागरिकांना सातत्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्यामुळे पाच नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदाईचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे नुकतीच केली आहे.


अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी शुक्रवार दि.२१ रोजी आढावा बैठक घेतली. या बैठकीत आ.काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विविध अनुत्तरीत विकासाच्या प्रश्नांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून घेत निधीची मागणी केली आहे.
या बैठकीसाठी नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार राजश्री घुले, खा. सदाशिव लोखंडे, खा. सुजय विखे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पंचायत समितीच्या सभापती पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, विमलताई आगवण,सोनाली साबळे, माजी सभापती अनुसयाताई होन,सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने आदी उपस्थित होते.

यावेळी आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील विकास कामांसाठी निधीची मागणी केली. त्याचबरोबर गावठाण हद्द वाढीचे प्रस्ताव तातडीने तयार करून अतिक्रमण करून गावठाण हद्दीत राहत असलेल्या नागरिकांचे अतिक्रमणे नियमित करावे.मागील पाच वर्षात स्थानिक आमदारांचे दुर्लक्ष झाल्यामुळे कोपरगाव त्याचबरोबर गावठाण हद्द वाढीचे प्रस्ताव तातडीने तयार करून अतिक्रमण करून गावठाण हद्दीत राहत असलेल्या नागरिकांचे अतिक्रमणे नियमित करावे.मागील पाच वर्षात स्थानिक आमदारांचे दुर्लक्ष झाल्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघाला गौण खनिज निधी अंतंर्गत एक रुपयाचा देखील निधी मिळाला नाही. त्यामुळे तालुक्याला गौण खनिज निधी मिळावा. वन विभागाने हरीण, काळवीट, रानगायी आदींमुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान थांबवण्यासाठी या जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा.जंगली जनावरांमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वन विभागाकडून तातडीने भरपाई द्यावी.वन विभागाच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचा पगार वेळेवर मिळावा. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांच्या कामाचा दर्जा राखला जावा. कोपरगाव तालुक्याच्या शेजारील तालुक्यातील व कोपरगाव विधानसभा मतदार संघातील गावा-गावांतील शिव शिव मोजणी करून त्या मोकळ्या करून द्याव्या.पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या वतीने सुरु असलेली डीबीटी योजना अर्थात प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेतून मिळणारी कोणतीही वस्तू अथवा शेती औजार खरेदी करण्याची या योजनेच्या लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे हि योजना बंद करून लाभार्थ्यांना वस्तूंचे वाटप करण्यात यावे अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी या आढावा बैठकीत मांडली.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close