जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

ओमनी कारचालकाचे नियंत्रण सुटून अपघात : दोन ठार,पाच जखमी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथुन सार्इदर्शन घेवून येत असलेल्या मारुती ओमनी कारवरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व सदर कार रस्ता दुभाजकावर जावून धडकली या घटनेत दोन जण जागीच ठार झाले असून पाच जण अत्यवस्थ आहेत त्यांना सार्इनाथ रुग्नालयात हलवण्यात आले आहे. सदरची घटना जंगली महाराज आश्रमा जवळ शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता घडली आहे. सदरचा अपघात एवढा भिषण होता की कार दुभाजकाला धडकून पलटी झाली त्याखाली सर्व प्रवासी दाबले गेले.सर्व प्रवासी खरगोण जिल्हा मध्यप्रदेश येथील होते.
या संबंधी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दि २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजणेचे सुमारांस बसकर मिथुन खेडेकर रा.धनपावडा ता.बडवा जि.खरगोण मध्यप्रदेश हे त्यांचे कुटूंबासह स्वत:च्या मारुती ओमनी कार नं. एम पी ०९बी.र्इ ०४९४ मधुन शिर्डी येथील श्री सार्इबाबांचे दर्शन घेवून मनमाडकडे जात असतां जंगली महाराज आश्रमाजवळील आले असता कार अतिशय भरधाव वेगात असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व कार तेथील रोड दुभाजकावर जावून आदळली गाडीचा वेग एवढा जोरात होता की कार दुभाजकाला धडकल्या नंतर पलटी झाली त्यात सना करेलु सोनगीर वय 40 व देवांशी सोनवे वय ५ वर्ष हे दोघे जागीच ठार झाले तर अरुणा कडवायजी खेडेकर ,सारिका सोनगीर,शितल सोनगीर, लक्ष्मी ,रुक्मिणी सोनगीर (नांव पूर्ण समजले नाही) सर्व रा.धनपायडा ता.बडवा जि.खरगोण मध्यप्रदेश हे सर्व जखमी झाले. या जखमींना शिर्डी येथील सार्इनाथ रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले या प्रकरणी कोपरगांव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून कारचालक मन्साराम कुंवरसिंग तंवर याचेवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरिक्षक राकेश मानगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ए. व्ही.गवसणे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close