जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

हद्द वाढ झालेल्या भागामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी द्या

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपालिका हद्दवाढ झालेल्या परिसरात होत असलेला पाणीपुरवठा कमी दाबाने होत असून हा पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दवाढ झालेल्या द्वारकानगरी, ओमनगर, शंकरनगर, कर्मवीर नगर आदी परिसरातील नागरिकांना नळाद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने केला जातो. कोपरगाव नगरपरिषद नळ धारकांकडून डबल पाणीपट्टी वसूल करते. मात्र त्या प्रमाणात कोपरगाव नगर परिषदेकडून पाणीपुरवठा होत नाही. याची दखल घेऊन पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करावा अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष संदीप कपिले, योगेश आमले, बाला गंगुले ,निरू उदावंत,बाला देवकर ,शोभा कोल्हे,संगिता साहाणे , सायली जोशी आदींसह नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close