जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात गत महिन्यात परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घालून शेती क्षेत्राचे मोठे नुकसान केले असून यातून शेतकरी सावरणे अवघड असल्याने राज्य सरकारने कोपरगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी महत्वपूर्ण मागणी सेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे.उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे व कोपरगाव तालुका शिवसेनेचे अध्यक्ष शिवाजी ठाकरे, आदिनाथ ढाकणे यांनी नुकतीच कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडे एका निवेदनाद्वारे आज सकाळी केली आहे.

कोपरगाव तालुक्यातील सोयाबीन,मका, बाजरी,या खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने त्यांनी अत्यंत तोकडी मदत जाहीर केली होती.त्यामुळे शेतकऱ्यांत मोठी नाराजी आहे.शेतकऱ्यांना किमान हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत देणे गरजेचे आहे.व तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना रब्बी पिके उभारणीसाठी कर्ज देण्यासह आवश्यक ते सर्व मदत द्यावी-राजेंद्र झावरे जिल्हाध्यक्ष

कोपरगावसह राज्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने राज्यात ऐन विधानसभा निवडणुकीत धुमाकूळ घालून सोयाबीन,मका.बाजरी आदी खरीप पिकांसह कापूस, फळबाग आदींचे मोठे नुकसान केले होते.मात्र विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष व त्यांचे नेते व कार्यकर्ते यांनी या बाबीकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने महत्वपूर्ण विषय ऐरणीवर आला नव्हता.अद्यापही राज्यात खुर्ची वरून महाआघाडी व भाजपात ताणाताणी सुरु आहे.कोर्टकचेऱ्या चालू असताना काल शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे ,उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे,कैलास जाधव,शहर प्रमुख सनी वाघ,आदींच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला वाचा फोडण्याचा उपक्रम घेण्यात आला होता.त्याला सर्व गटाच्या शिवसैनिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, कोपरगाव तालुक्यातील सोयाबीन,मका, बाजरी,या खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने त्यांनी अत्यंत तोकडी मदत जाहीर केली होती.त्यामुळे शेतकऱ्यांत मोठी नाराजी आहे.शेतकऱ्यांना किमान हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत देणे गरजेचे आहे.व तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना रब्बी पिके उभारणीसाठी कर्ज देण्यासह आवश्यक ते सर्व मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सदर प्रसंगी विधानसभा संघटक अस्लम शेख,माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव,गोदा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे,गणेश जाधव,नितीश बोरुडे,माजी शहर प्रमुख भरत मोरे,धर्मा जावळे,वसीम शेख, विश्वास पाटोळे, विक्रांत झावरे, गोपाळ वैरागळ, संतोष जाधव,सानी काळे.ऋषिकेश धुमाळ,आदींसह बहुसंख्य शिव सैनिक उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close