जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

राहाता तालुक्यातही ओला दुष्काळ जाहीर करण्याची सेनेची मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

शिर्डी (प्रतिनिधी)

राहाता तालुक्यात गत महिन्यात परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घालून शेती क्षेत्राचे मोठे नुकसान केले असून यातून शेतकरी सावरणे अवघड असल्याने राज्य सरकारने राहाता तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी महत्वपूर्ण मागणी राहाता तालुका शिवसेनेचे अध्यक्ष संजय शिंदे,कमलाकर कोते,अनिल बांगरे, सचिन कोते यांनी नुकतीच राहाता तालुक्याचे तहसीलदार यांचेकडे एका निवेदनाद्वारे आज सकाळी केली आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, कोपरगाव तालुक्यातील सोयाबीन,मका, बाजरी,या खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने त्यांनी अत्यंत तोकडी मदत जाहीर केली होती.त्यामुळे शेतकऱ्यांत मोठी नाराजी आहे.शेतकऱ्यांना किमान हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत देणे गरजेचे आहे-संजय शिंदे, तालुकाध्यक्ष

राहाता तालुक्यासह राज्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने राज्यात ऐन विधानसभा निवडणुकीत धुमाकूळ घालून सोयाबीन,मका.बाजरी आदी खरीप पिकांसह कापूस, फळबाग आदींचे मोठे नुकसान केले होते.शेतकरी कर्जबाजारी झाला आहे मात्र विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष व त्यांचे नेते व कार्यकर्ते यांनी या बाबीकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने महत्वपूर्ण विषय ऐरणीवर आला नव्हता.अद्यापही राज्यात खुर्ची वरून महाआघाडी व भाजपात ताणाताणी सुरु आहे.कोर्टकचेऱ्या चालू असताना काल शिवसेनेचे नेते संजय शिंदे ,कमलाकर कोते,अनिल बांगरे,,आदींच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला वाचा फोडण्याचा उपक्रम घेण्यात आला होता.त्याला सर्व गटाच्या शिवसैनिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि,राहाता तालुक्यातील सोयाबीन,मका, बाजरी,या खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने त्यांनी अत्यंत तोकडी मदत जाहीर केली होती.त्यामुळे शेतकऱ्यांत मोठी नाराजी आहे.शेतकऱ्यांना किमान हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत देणे गरजेचे आहे.व तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना रब्बी पिके उभारणीसाठी कर्ज देण्यासह आवश्यक ते सर्व मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
निवेदन देण्यासाठी सोमनाथ गोरे,विजय गोहर, अक्षय तळेकर,सूयोग सावकारे,जयराम कांदळकर,राजू कोते,अनिल गायके, आशिष गाडेकर,महेश कुलकर्णी,गंगाधर बेंद्रे,अण्णासाहेब अरगडे,विश्वजित बागुल,अमोल खापटे,अतुल कोते,रवी डोखे,कारभारी बेंद्रे आदींसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close