कोपरगाव तालुका
कोपरगाव शहर पोलीस ठाणे स्थलांतरित,
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचा नूतन इमारतीचे काम श्रीरामपूर येथील भुतडा कन्ट्रक्शन या कंपनीस उभारणीस दिले असून ते सध्या जोमाने सुरु असल्याने वर्तमानात शहर पोलीस ठाणे गुरुद्वारा रस्ता पंचायत समितीजवळ डॉ.वाबळे हॉस्पिटल शेजारी आजपासून स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी जनशक्ती न्यूजला दिली आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याची इमारत इंग्रज कालखंडातील होती.ती जीर्ण झाली होती.पोलीस वसाहतीच्या बाबतीतही वेगळी स्थिती नव्हती म्हणून पोलीस प्रशासनाने 2011 साली नूतन इमारतीचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत राज्याच्या गृहविभागाला पाठविण्यात आला होता.त्याला गत वर्षी मंजुरी मिळून सदरचे काम श्रीरामपूर येथील भुतडा कन्ट्रक्शन या कंपनीस दिले होते.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याची इमारत इंग्रज कालखंडातील होती.ती जीर्ण झाली होती.पोलीस वसाहतीच्या बाबतीतही वेगळी स्थिती नव्हती म्हणून पोलीस प्रशासनाने 2011 साली नूतन इमारतीचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत राज्याच्या गृहविभागाला पाठविण्यात आला होता.त्याला गत वर्षी मंजुरी मिळून सदरचे काम श्रीरामपूर येथील भुतडा कन्ट्रक्शन या कंपनीस दिले होते.त्यांनी पावसाळा संपताच काम सुरु केले होते.त्यामुळे जुन्या इमारती खाली करून देणे गरजेचे होते.त्यामुळे हे स्थलांतर अटळ बनले होते.त्यासाठी शहरातील मध्यवस्तीत असलेल्या गुरुद्वारा रस्त्यालगत डॉ.वाबळे यांच्या शेजारील सर्व्हे नं.2025 यातील अशोक काशिनाथ शिरोडे यांच्या बंगल्यात हे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे.त्यामुळे तक्रारदार,फिर्यादी,अर्जदार,निवेदनकार यांनी या नवीन पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन शेवटी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी शेवटी केले आहे.