जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात आ. कोल्हे ,राजेश परजणे यांचेसह नऊ अर्ज दाखल,शेवटचा दिवस बाकी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-( प्रतिनिधी )

कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र भरण्याच्या सातव्या दिवशी सात इच्छुकांनी आपले नऊ अर्ज नेले असले तरी प्रत्यक्षात काल सकाळच्या सत्रात कोपरगावच्या आ. स्नेहलता कोल्हे यांनी भाजपच्या वतीने शहरात गर्दीचे प्रदर्शन करत आपले दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.त्याच बरोबर गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनीही अपक्ष म्हणून दोन अर्ज दाखल केल्याने तालुक्याचे विधानसभा निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट होत आले असून या मतदारसंघात वंचित आघाडीसह पंचरंगी लढत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.बहुजन वंचित आघाडीच्या वतीने अशोक विजय गायकवाड,तर अपक्ष म्हणून बाळकृष्ण तुकाराम दिक्षित,खाटीक अल्लाद्दीन समशुभाई अशी अन्य अर्ज दाखल करणाऱ्यांची नावे आहे.

भाजपकडे निष्ठावान म्हणून कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांचा अग्रहक्क होता. मात्र गत वेळीही भाजपने या मतदारसंघात आयारामांना पायघड्या घातल्या होत्या या वेळी तरी भाजप निष्ठवाणाना संधी देईल अशी तालुक्याच्या राजकीय वर्तुळात अपेक्षा होती मात्र उमेदवारी जाहीर झाल्याने ती फोल ठरली आहे.निष्ठेपेक्षा थैली महत्वाची ठरल्याने भाजपही काँग्रेस व राष्ट्रवादीपेक्षा वेगळा नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले असल्याची मतदारसंघात चर्चा आहे.

राज्यातील 288 जागांसाठी विधानसभा निवडणूक येत्या 21 ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे.इच्छुक उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी 27 सप्टेंबर पासून प्रारंभ झाला आहे. कोपरगावात कोण कोणत्या बाजूने किंवा पक्षाच्या वतीने लढणार हि उत्कंठा खूपच ताणवली गेली होती.भाजपकडे निष्ठावान म्हणून कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांचा अग्रहक्क होता. मात्र गत वेळीही भाजपने या मतदारसंघात आयारामांना पायघड्या घातल्या होत्या या वेळी तरी भाजप निष्ठवाणाना संधी देईल अशी तालुक्याच्या राजकीय वर्तुळात अपेक्षा होती मात्र उमेदवारी जाहीर झाल्याने ती फोल ठरली आहे.निष्ठेपेक्षा थैली महत्वाची ठरल्याने भाजपही काँग्रेस व राष्ट्रवादीपेक्षा वेगळा नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

गुरुवार दि.३ आँक्टोबर रोजी कोपरगांव विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज नेणे आणि दाखल करणेसाठी ७ लोकांनी ९ अर्ज नेले असून.आत्ता पर्यंत ५९ उमेदवारांनी ९७ उमेदवारी अर्ज नेले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा चार ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे.इच्छुकांनी आपले अर्ज भरुन निर्धारित वेळेत सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत
दाखल करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे,प्रशांत सरोदे आदींनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close