जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयात हिंदी दिवस समारोह संपन्न 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयात हिंदी विभाग व राष्ट्रभाषा सेवा मंच,कोपरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवस व पुरस्कार वितरण समारोह कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

“कोपरगाव येथील राष्ट्रभाषा सेवा मंच’ ची हिंदी भाषा प्रचार-प्रसाराची प्रदीर्घ परंपरा जपत असून व हिंदी भाषेच्या विकासासाठी ग्रंथालय सातत्याने। जागृती करत आहे हि भूषणावह बाब आहे”-पद्मकांत कुदळे,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध हास्य कवी व सब टि.व्ही.फेम संजय बन्सल यांना आमंत्रित करण्यात आले होते.या समारोह कार्यक्रमासाठी कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,’राष्ट्रभाषा सेवा मंच’ चे अध्यक्ष पद्मकांत कुदळे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,संस्थेचे विश्वस्त संदिप रोहमारे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.आर.सोनवणे,प्रो.डॉ.विजय ठाणगे,प्रो.डॉ.के.एल.गिरमकर,प्रो.डॉ.एस.आर.पगारे,डॉ.गणेश देशमुख,चास येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य नारायण बारे,महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे,कोपरगांव येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अधिकारी रणजीत झा,बँक ऑफ बडोदा शाखा अधिकारी दिपक जांभरूनकर,प्रो.डॉ.संजय अरगडे,  डॉ.रविंद्र जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी हास्य कवी संजय बन्सल यांनी हिंदी भाषेचे महत्व विषद करतानांच आपल्या मिश्किल शैलीने उपस्थित विद्यार्थांना खिळवून ठेवले.मोबाईल सारख्या आधुनिक तत्रज्ञानाच्या अति वापरामुळे होणारा दुष्परिणाम त्यांनी काव्य शैलीतून नमूद केला.आपल्या विनोदी शैलीने श्रोत्यांची वाहवा मिळवितांनाच हास्य कवितेतून शैक्षणिक व सामाजिक विचारही विद्यार्थी मनावर बिंबविले.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘राष्ट्रभाषा सेवा मंच’चे कार्यवाहक सुरेश गोरे यांनी तर सुत्रसंचलन जे.एम.मोरे यांनी केले आहे.तर उपस्थितांना मार्गदर्शन प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी केले तर उपस्थितांचे आभार कनिष्ठ महाविद्यालयातील हिंदी विषयाचे प्राध्यापक जे.आर.भोंडवे यांनी मानले आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डी.जे.जाधव,प्रा.श्रध्दा खालकर,प्रा.पुजा गख्खड,प्रा.मधूमिता निळेकर,योगेश कोळगे,प्रमोद येवले यांनी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close