आरोग्य
सावळीविहिर जि. प.शाळेत सकस आहार सप्ताह उत्साहात साजरा
संपादक-नानासाहेब जवरेसावळीविहिर (प्रतिनिधी)
राहता तालिक्यातील सावळीविहीर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पोषण आहार सप्ताह निमित्त सत्वयुक्त पोषण आहाराच्या खाद्यपदार्थांचे येथे विद्यार्थ्यांनी भव्य प्रदर्शन नुकतेच भरविले होते या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद लाभला आहे.सावळीविहिर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नुकतेच पोषण आहार सप्ताह निमित्त पोषण व सत्वयुक्त आहारातील विविध खाद्यपदार्थांचे प्रदर्शन या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा प्रांगणात मोठ्या उत्साहात भरवले होते या शाळेतील छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी कोणी डाळिंब, कोणी पेरू. केळी, काकडी, फळे आपल्या स्टॉलवर ठेवून या फळांचे गुणधर्म त्यातील जीवनसत्त्व यांची माहिती संकलित करून ठेवण्यात आली होती कोणी कोथंबीर पालक भाजी मेथीची भाजी तर कोणी थालपीठ कोणी सत्वयुक्त लाडू व वेगवेगळे कसदार व पौष्टिक असे खाद्यपदार्थ आणून या प्रदर्शनात ठेवले होते सुमारे 65 विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेऊन वेगवेगळे सकस खाद्यपदार्थ फळे भाज्या कडधान्य ठेवून त्यांची माहिती गुण जीवनसत्वे आदींची माहितीही ही संकलित करून तेथे ठेवण्यात आली होती. कोणत्या फळ भाजी पासून कोणते घटक शरीराला मिळतात हे विद्यार्थी प्रदर्शन पाहणाऱ्यांना सांगत होते तसेच स्वतःला कुटुंबाला व त्याचबरोबर सर्व समाजालाही समजावं त्यातून उत्तम आरोग्य अबाधित राहावे असा हा हेतू या प्रदर्शनाचा होता येथील हे प्रदर्शन जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापिका सौ. वाणी तसेच दत्ता गायकवाड, विकास दर्शने व महिला शिक्षकांनी विशेष परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने भरविले होते या प्रदर्शनाला येथील विविध पदाधिकारी ग्रामस्थ पत्रकार यांनी भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले