जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

“गायत्रीचा” स्टार प्रचारक कोणाच्या इशाऱ्यावर नाचतो हे जनतेला समजत आहे-वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव नगरपरिषदेच्या पाणी पुरवठ्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या साठवण तलाव क्रमांक पाच हा होऊच नये या साठी कोणी अडथळे आणले हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.हीच मंडळी आता पराभवाला घाबरल्याने सहकारातील यंत्रणा हाताशी धरून लाखो रुपये खर्चून शतप्रतिशत खोटी पत्रके जनतेच्या दारात टाकून शहरातील जनतेला संभ्रमात टाकण्याचे पातक करत असल्याची टीका कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

नगरपरिषदेत आपण अपक्ष निवडून आल्याने अनेकांच्या स्वप्नात मोदी मंच येत असून आपल्या राजगादीला धोका झाल्याची जाणीव झाल्यापासून हि मंडळी खूपच अस्वस्थ झाली असून यांना स्वप्नातही संताजी-धनाजी सारखी मोदी मंच व त्याचे कार्यकर्ते दिसू लागले असून याना कुठल्याही स्थितीत सत्तेपर्यंत पोहचू द्यायचे नाही याचा या मंडळींनी चंग बांधला आहे.म्हणूनच पिंजऱ्यात कधीच न बोलणारे पोपट आपल्या निवडक माध्यम भाटासंमोर आणून त्यांच्याकडून आपल्या सोयीचे वदवून घेण्याचे षडयंत्र राबवले जात आहे हे न जाणण्या इतकी जनता दुधखुळी राहिलेली नाही.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे कि,समृद्धी महामार्गाच्या उपकंत्राटे कोणी मिळवली व जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित ठेकेदार काम करण्यात तयार असल्याचे आपण त्याच वेळी सप्रमाण जनतेच्या निदर्शनात आणून दिले होते.ठेकेदाराला परवडेल का ? असा सवाल कोणी केला होता ते आता त्याच वेळी जनतेला माहित होऊन यांचा फुगा फुटला होता आता त्यातून सावरण्यासाठी राजकीय सत्तेचा व दबावाचा वापर करून हि मंडळी,” बुंद से गयी, ओ हौद से नही आती” या बिरबलाच्या गोष्टीचे या मंडळींना भान राहिलेले दिसत नाही.आपण एवढे कर्तबगार होता तर तालुक्यातून 115 टि. एम.सी.पाणी गोदावरीतून जायकवाडीत वाहून गेले तर दुसरीकडे तालुक्यातील खरीप पिके पाण्यापाचून सुकून गेली त्यावेळी यांचे कर्तृत्व कुठे गेले होते.तालुक्याचे अकरा टि. एम.सी.पाणी उद्योगांना व महापालिकांना व नात्यातील लोकांना उपसा सिंचन योजनांना कोणी वाटून दिले हे जग जाहीर करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला असून खोट्याची चादर खूपच आखूड असते याचे त्यांनी भान ठेवावे.असा इशारा आ. कोल्हे यांचे नाव न घेता दिला आहे.

आपल्यावरच उलटलेले आरोप करून कोपरगाव नगरपालिकेला बदनाम करण्याचा व आपली पोळी भाजण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव उघड होतो यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.”रेड्डि” नामक कठपुतळी कोपरगावच्या राजकारणात कोण नाचवत आहे? या कठपुतळीस बोलण्यास कोण भाग पाडत आहे ? हे जनतेला समजत आहे.हि कठपुतळी यापूर्वी मौनी बाबा बनली होती तिला कंठ कोणाचा,आवाज कोणाचा तिचे कथानक कोणाचे ? हे सर्व नागरिक ओळखत आहे.-वहाडणे

नगरपरिषदेत आपण अपक्ष निवडून आल्याने अनेकांच्या स्वप्नात मोदी मंच येत असून आपल्या राजगादीला धोका झाल्याची जाणीव झाल्यापासून हि मंडळी खूपच अस्वस्थ झाली असून यांना स्वप्नातही संताजी-धनाजी सारखी मोदी मंच व त्याचे कार्यकर्ते दिसू लागले असून याना कुठल्याही स्थितीत सत्तेपर्यंत पोहचू द्यायचे नाही याचा या मंडळींनी चंग बांधला आहे.म्हणूनच पिंजऱ्यात कधीच न बोलणारे पोपट आपल्या निवडक माध्यम भाटासंमोर आणून त्यांच्याकडून आपल्या सोयीचे वदवून घेण्याचे षडयंत्र राबवले जात आहे हे न जाणण्या इतकी जनता दुधखुळी राहिलेली नाही.यातून पालिकेला बदनाम करून आपली पोळी भाजण्याचा डाव उघड होतो यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.”रेड्डि” नामक कठपुतळी कोपरगावच्या राजकारणात कोण नाचवत आहे? या कठपुतळीस बोलण्यास कोण भाग पाडत आहे ? हे जनतेला समजत आहे.या बाबत आपण पाच क्रमांकाच्या तलावाचा सगळा घटनाक्रम एका प्रसिद्धीपत्रकात दिला आहे.तालुक्यातील अनेक गावात चोरी-चोरी छुपे-छुपे जाण्याची व बैठक घेण्याची ज्यांच्यावर वेळ आली हाच यांच्या कर्तबगारीची मोठा पुरावा असल्याचा शालजोडाही विजय वहाडणे यांनी शेवटी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close