कोपरगाव तालुका
आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलात ‘प्रिफेक्ट’ प्रदान सोहळा संपन्न
कोपरगांव ( प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठ संचलित, आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलात मोठया उत्साहात विद्यार्थी नायक प्रदान सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून कोपरगांव तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शरद थोरात, संत विवेकानंद महाराज, संत चंद्रानंद महाराज, संत राजानंद महाराज, संत योगानंद महाराज, संत षांतीमाई, संत ध्यानीमाई, संत स्वरुपामाई, संत प्रभावतीमाई आदी संतगण तसेच विभाग प्रमुख रमेष कालेकर, पर्यवेक्षक बाळासाहेब कराळे, रवींद्र देठे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थी नायक असलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्याविश्कार, नाटिकेचे सादरीकरण करित कार्यक्रमात चैतन्य फुलविले. सदर प्रसंगी विद्याथ्र्यांमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण तयार झाले व बहुतेक विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता.
या समारंभाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले शरद थोरात यांनी सर्व विद्यार्थ्यांनी सन्मानपात्र जीवन कसे जगावे? सवय शिस्तिची जोपासना कशी करावी व जीवनात शिस्तीचे महत्व काय आहे या बाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी ते म्हणाले, ‘‘शालेय वय हे बालकांवर सुसंस्कार करण्याचा कालखंड असतो. या वयामध्ये विद्यार्थ्यांनी नेहमी स्वविकास साधण्याचा प्रयत्न करायला हवा. या संस्कारक्षम वयात शिस्तीचे धडे स्वयं प्रेरणेने घेतले पाहिजेत.’’ अशा विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.