जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात आशुतोष काळेंचा राष्ट्रवादीचा उद्या निर्णय होणार !

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत आपले नामनिर्देशन भरण्यासाठी अवघा दोन दिवसाचा कालावधी राहिलेला असताना अद्याप कोपरगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला या बाबत स्पष्ट चित्र होत नसताना या बाबत निर्णय घेण्यासाठी गुरुवार दि.3 ऑक्टोबर रोजी कर्मवीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी आपल्या समर्थकांची सकाळी नऊ वाजता बैठक आयोजीत केली असून त्याच ठिकाणी निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भाजप कार्यकारीणीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केल्याने व कोपरगावात आ. स्नेहलता कोल्हे यांची अकस्मात वर्णी लागलेली असताना अनेक इच्छुकांना या धक्क्याने सावरणे अवघड जात आहे.त्यातच सर्वात मोठा धक्का बसला असेल तो कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांना त्या पाठोपाठ दुसरा धक्का बसला तो कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांना. त्यानंतर गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे व त्या पाठोपाठ शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे याना.यातून सावरणे सर्वात अवघड जात आहे ते काळे यांना .

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण आता नामनिर्देशन भरण्याची अंतिम वेळ जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे वातावरण तापत चालले आहे.राज्याच्या भाजप कार्यकारीणीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केल्याने व कोपरगावात आ. स्नेहलता कोल्हे यांची अकस्मात वर्णी लागलेली असताना अनेक इच्छुकांना या धक्क्याने सावरणे अवघड जात आहे.त्यातच सर्वात मोठा धक्का बसला असेल तो कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांना त्या पाठोपाठ दुसरा धक्का बसला तो कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांना. त्यानंतर गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे व त्या पाठोपाठ शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे याना .एकाच उमेद्वारीवर या चौघांचा डोळा होता.त्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न केले खरे मात्र त्यात सर्वात मोठे यश संपादन केले ते आ. स्नेहलता कोल्हे यांनी.ते कोणत्या मार्गाने केले ते दुसऱ्या विशेष बातमीत त्याचा उल्लेख होईलच.पण सर्वात जास्त प्रतिष्ठा पणाला लागली ती आशुतोष काळे यांची.

आता आशुतोष काळे यांच्या समोर दोनच पर्याय शिल्लक राहिले असून त्यात पहिला पर्याय हा राष्ट्रवादीचा आहे तर दुसरा पर्याय हा अपक्ष निवडणूक लढवणे हा आहे.तथापि राष्ट्रवादीतून निवडणूक लढवणे आता त्याच्यासाठी सोपे राहिलेलं नाही.पवारांच्या जेष्ठ व कनिष्ठ पातीनी त्यांना अनेक निरोप धाडूनही ते त्याच्या दरबारात हजर झाले नव्हते.अनेक वेळा भ्रमनध्वनिवरून संपर्क करूनही त्यांनी आपला फोन उचलला नव्हता.त्यामुळे त्या मार्गाचे एक अर्थाने आशुतोष काळे यांनीच दोर कापुन टाकले होते.त्यामुळे त्यांना आता त्या पक्षाची उमेदवारी भरावयाची असल्यास त्यांना आता आपले पंढरपुरच (नेवासा येथील सासुरवाडीचे लोक) मदत करू शकतात.

त्यांनी या लढाईत सर्व आयुधे वापरूनही हाती अपयश आले.तथापी त्यांनी दाखवलेल्या मार्गाचाच उपयोग करत आ. कोल्हे यांनी आपले ध्येय साध्य केले असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.त्यामुळे शेवटपर्यंत ते आशावादी होते.असो आता ती वेळ निघून गेली असून आता त्यांच्या समोर दोनच पर्याय शिल्लक राहिले असून त्यात पहिला पर्याय हा राष्ट्रवादीचा आहे तर दुसरा पर्याय हा अपक्ष निवडणूक लढवणे हा आहे.तथापि राष्ट्रवादीतून निवडणूक लढवणे आता त्याच्यासाठी सोपे राहिलेलं नाही.पवारांच्या जेष्ठ व कनिष्ठ पातीनी त्यांना अनेक निरोप धाडूनही ते त्याच्या दरबारात हजर झाले नव्हते.अनेक वेळा भ्रमनध्वनिवरून संपर्क करूनही त्यांनी आपला फोन उचलला नव्हता.त्यामुळे त्या मार्गाचे एक अर्थाने आशुतोष काळे यांनीच दोर कापुन टाकले होते.त्यामुळे त्यांना आता त्या पक्षाची उमेदवारी भरावयाची असल्यास त्यांना आता आपले पंढरपुरच (नेवासा येथील सासुरवाडीचे लोक) मदत करू शकतात.त्यासाठी ते तिथपर्यंत जाणार का ? हा प्रश्न आहे,ते जरी गेले नाही तरी त्यांना जावयासाठी काही तरी करावेच लागणार आहे ते ओघाने आलेच.असे असताना त्यांचीच राष्ट्रवादीचे तिकीट घेतल्यास कसे तोटे होणार,मते कशी कमी पडणार ! याचे पोवाडे गायले असल्याने आता ज्या हाताने फुले वेचली त्याच हाताने गोवऱ्या वेचण्याचा अनास्था प्रसंग त्यांच्यावर गुदरणार आहे.त्यांनी भाजपची यादी मंगळवारी जाहीर झाल्यावर तातडीने साईबाबा चौकातील आपल्या विश्वस्त व्यवस्थेत रात्री बैठक घेऊन शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची रात्री बारा वाजेपर्यंत मते आजमावली मात्र त्यात राष्ट्रवादी कि अपक्ष यावर शिक्का मोर्तब होऊ शकले नाही.त्यामुळे आता शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक त्यांनी गुरुवारी सकाळी नऊ वाजता सुरेगाव शिवारातील सिद्धार्थ लॉन्स येथे आयोजित केल्याचे समजते.त्याच वेळी आलेल्या कार्यकर्त्यांची मनोगते जाणून घेऊन ते आपला निर्णय घोषीत करून त्याच दिवशी आपले नामनिर्देशन भरतील असा अंदाज आहे.त्यांच्या निर्णयाकडे त्याच्या कार्यकर्त्यांचे व मतदार संघातील मतदारांचे लक्ष लागून आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close