कोपरगाव तालुका
दोन वेगवेगळ्या घटनांत दोन ठार,कोपरगाव पोलीस ठाण्यात नोंद
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यात पढेगाव व दहिगाव बोलका या दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या घटनांत अरुणा अजय भडांगे (वय-35)रा.सावळीविहिर ता. राहाता व दहिगाव बोलका येथील ज्ञानदेव रामकृष्ण निघोट (वय-55) या दोघांचा वेगवेगळ्या कारणाने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,राहाता तालुक्यातील महिला अरुणा अजय भडांगे या रविवार दि.चार सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आपल्या घरी येत असताना त्यांचा अपघात कोपरगाव तालुक्यातील पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत झाला त्यांना उपचारार्थ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याना मृत घोषित केले आहे. या प्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद वहीत कोपरगाव तालुका पोलिसांनी त्यांच्या मृत्यूची नोंद केली आहे.
तर दुसरी घटना हि दहिगाव बोलका येथील असून तेथिल इसम ज्ञानदेव निघोट यांना आपल्या शेतात विजेचा तीव्र धक्का लागून त्यात त्यांना उपचारार्थ कोपरगाव रुग्णालयात दाखल केले असता तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.या दोन्ही घटनांची कोपरगाव तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. एम.आंधळे व सहाय्यक फौजदार एस.सी.पवार हे करीत आहेत.