जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात प्रभारी गटशिक्षण अधिकाऱ्यांविरुद्ध शिक्षकदिनीच आंदोलन,केली निलंबनाची मागणी

जाहिरात-9423439946

संपादक- नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव पंचायत समितीत राजकीय आशीर्वादाने प्रभारी गटशिक्षण अधिकारी पदावर अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या शबाना शेख या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचे तातडीने निलंबन व्हावे या प्रमुख मागणीसाठी ऐन शिक्षक दिनीच कोपरगाव पंचायत समिती समोर कोपरगाव तालुक्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व त्यांच्या सदस्य शिक्षकांनी आंदोलन करून कहर उडून दिला आहे.तथापि अद्याप तरी त्यांची कोणतीही मागणी मंजूर होण्याची शक्यता दिसत नसल्याने या शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने जिल्हा परिषद सदस्य राजेश परजने यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”या बाबत आपल्याला काहीच माहित नसून काय चालूं आहे त्याची कुठलीही कल्पना नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि.कोपरगाव तालुक्यात शबाना शेख या महिला शिक्षणविस्तार अधिकारी अनेक वर्षांपासून कोपरगाव पंचायत समितीत ठाण मांडून बसल्या असून त्या नुसत्या शिक्षण विस्तार अधिकारी असत्या तर कोणाचीही हरकत असण्याचे कारण नव्हते मात्र या बाईसाहेब जिल्हापरिषदेतील एका प्रमुख पदाधिकाऱ्याच्या जवळच्या नात्यातील सदस्यांच्या कलाने कारभार हाकत असून त्यामुळे तालुक्यातील शिक्षक धास्तावून गेले आहे.

या पूर्वीच टाकळीसह दोन गावातील शिक्षकांनी या प्रभारी राजला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा शिक्षक संघटनांचा आक्षेप आहे.ज्या दोन शिक्षकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा या संघटनांनी आरोप केला आहे.या प्रकरणी शिक्षक संघटनानी तीस ऑगष्ट रोजी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा आयोजित करण्याचा इशारा दिला होता मात्र शिक्षणाधिकारी यानीं एकोणतीस ऑगष्ट रोजीच त्याची दखल घेऊन या शबाना शेख यांची चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र राजकीय दबावातून त्यावर अद्यापही काहीच कारवाई झालेली नाही हे विशेष

कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,” कोपरगाव साठी नवीन गट शिक्षणाधिकारी पोपटराव काळे यांनी राहत्यासह पदभार घेतला असून उद्या आमची मासिक बैठक होणार असून त्यावर चर्चा करू असे आश्वासन दिले आहे.

पाच ऑगष्ट रोजीच्या पत्रात त्यांचा कार्यभार काढण्यात येईल असे लेखी देऊनही ते पाळले गेले नाही. शिक्षकांच्या किरकोळ चुकीच्या चौकशीसाठी तात्काळ समिती नेमली जाते मात्र या प्रभारी राजवर एवढा जीव ओवाळून कशासाठी टाकला जात आहे ? असा या संघटनांचा आक्षेप आहे.या महोदया याच ठिकाणी राहिल्या तर त्या एकसातून कारवाई करू शकतात असा शिक्षक संघटनांचा व्होरा आहे.त्यामुळे आम्ही सामूहिक राजा टाकू असा इशाराही या संघटानांनी शेवटी दिला आहे.

एका जेष्ठ सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर स्वतंत्र गट शिक्षणाधिकाऱ्याची कोपरगाव पंचायत समितीस गरज असून त्याकडे कानाडोळा करणे परवडणारे नाही अशी प्रतिक्रिया नोंदवून तीन वर्षाचा कालखंड हा नियम सर्वांना का लागू होत नाही असा सवाल केला आहे.व एकीकडे प्रशासनात जागा रिक्त असतांना राज्य सेवा परीक्षेचे विद्यार्थी उत्तीर्ण होऊनही त्याना सेवेत घेतले जात नाही या बाबत खेद व्यक्त केला आहे.यात दोन जेष्ठ सदस्यांचे भांडणाचा हा परिणाम असल्याचे सांगून शिक्षकांना विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी थोडी तसदी घेतली तर त्यांनी उगीच आकांड तांडव करू नये असा सल्ला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close