जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

डाळिंब विम्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम द्या-आशुतोष काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी डाळींबाच्या फळ पीक विम्याची रक्कम भरूनही. काहींना फळ पीक विमा मंजूर झाला तर काही शेतकरी मात्र त्या पासून वंचित असल्याचा तालुक्यात विरोधाभास आहे.त्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने विम्याची रक्कम द्यावी. अशी मागणी कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात त्यानी पुढे असे म्हटले आहे की, विमा कंपनीकडून आपल्या पिकाचे नुकसान झाल्यास भरपाई मिळते या आशेवर शेतकरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पोटाला चिमटा देऊन विमा कंपनीकडे पिकांच्या विम्याची रक्कम नियमितपणे दिलेल्या मुदतीच्या आत भरीत असतात. मागील वर्षी कोपरगाव तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीकडे डाळिंब फळ पीक विमा रक्कम मुदतीच्या आत जमा केली होती.

कोपरगाव तालुक्याला मृगबहार फळ पीकविमा मंजूर होऊन काही डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर या डाळिंब फळपिक विम्याची रक्कम जमा झाली आहे. परंतु कोपरगाव तालुक्यातील अनेक डाळिंब उत्पादक शेतकरी डाळिंब फळ पीक विम्यापासून वंचित राहिले आहे.बँक, ऑनलाईन सेवा प्रणाली करणारे केंद्र व प्रशासन यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आढळून येत असल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.


कोपरगाव तालुक्याला मृगबहार फळ कोपरगाव तालुक्याला मृगबहार फळ पीकविमा मंजूर होऊन काही डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर या डाळिंब फळपिक विम्याची रक्कम जमा झाली आहे. परंतु कोपरगाव तालुक्यातील अनेक डाळिंब उत्पादक शेतकरी डाळिंब फळ पीक विम्यापासून वंचित राहिले आहे.बँक, ऑनलाईन सेवा प्रणाली करणारे केंद्र व प्रशासन यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आढळून येत असल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. डाळिंब फळ पीक विम्या संदर्भात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी ज्या बँकेमध्ये डाळिंब फळ पीक विम्याची रक्कम भरली आहे त्या बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हे अधिकारीही विमा कंपनीच्या मनमानी कारभाराला वैतागलेले दिसून येत आहे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी एस.बी.आय., जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी दुरध्वनीवरून संपर्क केला असता कोणतेही प्रतिउत्तर मिळत नाही.या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज पाठवूनही आजपर्यंत दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. डाळिंब फळ पीक विम्याच्या भरोशावर शेतकरी बसले आहेत. परंतु विमा कंपनीकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्यामुळे कदाचित काही अप्रिय घटनाही घडू शकतात. त्यामुळे आपण जातीने लक्ष घालून सबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना योग्य ती समज देऊन डाळिंब फळ पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना डाळिंब फळ पीक विम्याची रक्कम मिळवून द्यावी असेही काळे यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close