जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

जि. प. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचे-आ. काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

ग्रामीण भागातील विद्यार्थी जगाच्या स्पर्धेत टिकला पाहिजे त्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व सुविधा मिळणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता आल्यापासून कोपरगाव तालुक्यात सर्व जिल्हा परिषद शाळांचा कायापालट होत असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नाटेगाव येथे जिल्हा परिषद सदस्या विमल आगवण यांच्या विकास निधीतून जिल्हा वार्षिक योजना २०१९-२० चे अंतर्गत जिल्हा परिषद शाळा खोलीचे भूमिपूजन तसेच नाटेगाव ग्रामपंचायतच्या १४ वित्त आयोगांतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे व पाणी टाकी परिसरास सुरक्षा कंपाऊंड करणे आदी कामांचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी ते बोलत होते.

यावेळी पंचायत समिती सभापती पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,जिल्हा परिषद सदस्या विमलआगवण,पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, कारभारी आगवण,राहुल जगधने,सरपंच कल्पना मोरे,उपसरपंच जयवंत मोरे,सर्व सदस्य तसेच गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,उपअभियंता उत्तमराव पवार, गट शिक्षण अधिकारी पोपट काळे, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, कृषी सहाय्यक निलेश बिबवे, ग्रामविकास अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचे काम प्रगतीपथावर आहेत.खाजगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मागे राहू नये असे सांगून मतदार संघातील नागरिकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देणार आहे.सुज्ञ मतदार ग्रामपंचायत,जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले.त्याप्रमाणेच मतदार संघाच्या विकासाचे अनुत्तरीत प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून जनतेच्या मनात असलेल्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी शेवटी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचे काम प्रगतीपथावर असून ते लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.मतदार संघातील नागरिकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देणार आहे.सुज्ञ मतदार ग्रामपंचायत,जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले.त्याप्रमाणेच मतदार संघाच्या विकासाचे अनुत्तरीत प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून जनतेच्या मनात असलेल्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close