जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात भूजल पुनर्भरण जनजागृती गरजेची- मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात नवीन शासकीय इमारतींची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु असून या इमारतीवर भूजल पुनर्भरण करणे गरजेचे असून याबाबत कोपरगाव नगरपरिषदेने जनजागृती करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केले आहे.

पावसाच्या पाण्याची साठवण म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे.पावसाचे पाणी घराच्या,इमारत छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात व वर्षभर पिण्यासाठी वापरतात.काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर,शाफ्ट किंवा बोअरवेल),पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात.पाणी जाळी किंवा इतर साधनांसह दंव किंवा धुक्यातूनही गोळा केले जाते. हे माणसासाठी अपेय असलेले पाणी गार्डन,पशुधन,सिंचन वा घरगुती वापरासाठी योग्य असते.

पावसाच्या पाण्याची साठवण (Rainwater harvesting) म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे.पावसाचे पाणी घराच्या,इमारत छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात व वर्षभर पिण्यासाठी वापरतात.काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर,शाफ्ट किंवा बोअरवेल),पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात.पाणी जाळी किंवा इतर साधनांसह दंव किंवा धुक्यातूनही गोळा केले जाते. हे माणसासाठी अपेय असलेले पाणी गार्डन,पशुधन,सिंचन वा घरगुती वापरासाठी योग्य असते.कापणीचे पाणी,पिण्याचे पाणी हे दीर्घ मुदतीची साठवण करून वापरले जाऊ शकते.वर्तमानात कोपरगाव शहराला पाणीटंचाईला वारंवार सामोरे जावे लागत असल्याने पावसाचे पाणी साठवून ठेवणे हि काळाची गरज बनली आहे.कोपरंगाव शहरात तर प्रत्येक उन्हाळ्यात हि टंचाई विशेषत्वाने जाणवते.त्या साठी नागरिकांनी याची अंमलबजावणी करण्याआधी सार्वजनिक संस्थानी याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.सध्या तहसीलदार,पंचायत समिती,न्यायालय,पोलीस ठाणे,राज्य परिवहन मंडळाचे कोपरंगाव आगर,कोपरगाव नगरपरिषद,व त्यांच्या वाचनालयाची इमारत आदी नव्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आल्या आहे.या खेरीज शहरात भारत संचार निगम,वन विभाग,विमा कंपनी,भूमी अभिलेख आदी इमारती आहेत त्यांनाही या भूजल पुनर्भरणाची सक्ती करणे गरजेचे आहे.त्या मूळे कोपरगाव व परिसराची भूजल पातळी वाढण्यास मदत राहणार आहे.या बाबत महाविद्यालये,शैक्षणिक संस्था,व्यापारी महासंघ,तरुण मंडळे, शिक्षक,डॉक्टर,बिल्डर्स,यादीमध्ये जागृती करणे गरजेचे असल्याचेही आदिनाथ ढाकणे यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close