जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात २०७१ व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने एक मे पासून संस्थात्मक विलगीकरणास प्रारंभ करण्यात आला असून आज आज पर्यंत आरोग्य विभागाने २ हजार ०७१ व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले असले तरी १ हजार ४८५ व्यक्तींनी हे विलगीकरण पूर्ण केल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव तालुक्यात बाहेर गावाहून ११ हजार ४२४ नागरिक आले आहे.त्यातील ८० पैकी २२ परदेशवारी करून आलेल्या संशयित नागरिकांची तपासणी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे केली आहे.व त्यांचे विलगीकरण केले होते.ते पूर्ण कोरोनारहित असल्याची खात्री झाल्यावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नाने कोपरगावात ९० खाटांचे कोविड-१९ केअर हॉस्पिटल सुरु केल्याने संशयित नागरिकांना देखरेखीखाली ठेवण्यास मोठी मदत झाली आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ०१ हजार ८०१ ने वाढून ती ३ लाख ४४ हजार ८७२ इतकी झाली असून ९ हजार ९२७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ०१ लाख १० हजार ७४४ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ०४ हजार १२८जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २४६ वर जाऊन पोहचली आहे तर ०९ जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.दिल्ली,मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव,संगमनेर हि कोरोनाची केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी पाचव्यांदा वाढवून ३० जून पर्यंत केली आहे.कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.त्या नंतर एका महिला डॉक्टरच्या रुग्णाची व भोजडे येथील एका अल्पवयीन मुलीची भर पडल्याने काळजी वाढली होती मात्र हे दोन्ही रुग्ण आता निरंक झाले आहे.त्यामुळे आता तालुक्यात एकही रुग्ण नसल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.या बाबत या दोन रुग्णांना आता सुटी दिली आहे.यात आरोग्य आणि पोलीस विभागाचे मोठे कार्य असले तरी शासनाने माध्यमाद्वारे केलेली जनजागृती त्याला कारणीभूत होती.कोपरगावच्या नजिक असलेले सर्व तालुके कोरोना बाधित असताना कोपरगाव तालुका आता निरंक झाला हि बाब समाधानकारक समजली जात आहे.या बाबत तहसीलदारांनी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत हि माहिती नुकतीच जाहीर केली होती.त्याला आता आणखी दुजोरा दिला गेला आहे.आरोग्य विभागाने या बाबतचे श्रेय जनतेला दिले आहे.या बाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी अधिकची माहिती देताना सांगितले की,”तालुक्यात बाहेर गावाहून ११ हजार ४२४ नागरिक आले आहे.त्यातील ८० पैकी २२ परदेशवारी करून आलेल्या संशयित नागरिकांची तपासणी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे केली आहे.व त्यांचे विलगीकरण केले होते.ते पूर्ण कोरोनारहित असल्याची खात्री झाल्यावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नाने कोपरगावात ९० खाटांचे कोविड-१९ केअर हॉस्पिटल सुरु केल्याने संशयित नागरिकांना देखरेखीखाली ठेवण्यास मोठी मदत झाली आहे.तेथे या नागरिकांची काळजी करण्यासाठी चोवीस तास दोन समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर,डॉ.वैशाली बडदे,डॉ.संतोष विधाते या रुग्णांची काळजी घेत होते.या कोरोना लढ्यात नागरिकां सोबतच नेते,पोलीस,आरोग्य अधिकारी, कर्मचारी,पत्रकार,यांचे मोठे योगदान दिल्याचे गौरोवोदगारही डॉ.विधाते यांनी शेवटी काढले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close